नवा गडी नवं राज्य मालिकेत सौरभ गोखलेची एन्ट्री!
झी मराठी वरील “नवा गडी नवं राज्य” हि मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडत आहे. मालिकेत रोज नवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत, कश्यप परुळेकर, अनिता दाते आणि पल्लवी पाटील अशी तगडी स्टारकास्ट या मालिकेत आहे, आणि ते प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. आता ह्या मालिकेत एक नवीन ट्विस्ट येणार आहे कारण ‘विराज इनामदारची’ एन्ट्री होणार आहे, कॉलेजपासून सर्व गोष्टींमध्ये राघवचा प्रतिस्पर्धी राहिलेला आणि राघवला नेहेमी कमी दाखवण्याच्या प्रयत्नात असलेला विराज राघवसाठी काही नवीन आव्हान घेऊन येणार का? राघव ह्या आव्हानांना कसा समोर जाईल? हे पाहणं औसुक्याच असणार आहे. अभिनेता सौरभ गोखले विराज इनामदारच्या भूमिकेत दिसणार आहे. सौरभ गोखले हा प्रसिद्ध अभिनेता असून त्याने वेगवेगळ्या मालिकेतून आणि चित्रपटातून आपली छाप सोडली आहे,
तेव्हा पाहायला विसरू नका ‘नवा गडी नवं राज्य’ सोमवार ते शनिवार रात्री ९ वा. फक्त आपल्या झी मराठी वर.
