fbpx

खेळात जिंकली पण प्रेमात जिंकेल का ही ३६ गुणी जोडी ?

झी मराठी वरील ‘३६ गुणी जोडी’ ह्या मालिकेचा प्रेक्षकांमध्ये बराच बोलबोला सुरु आहे. प्रत्येक सप्ताहात हि मालिका काहींना काही नवीन वळण घेत असते. आतापर्यंतच्या भागात आपण पाहिलं कि, अवॉर्ड जिंकल्यावर वेदांत आणि अमूल्या रात्री ऑफिस मध्ये येतात. वेदांत एक ईमेल करण्यासाठी म्हणून ऑफिस मध्ये जातो. त्याच्या पाठोपाठ अमूल्या सुद्धा तिथे पोचते, पण दोघे ऑफिस मध्येच अडकतात.दोघांच्याही घरी काळजी सुरू होते. इकडे ऑफिस मधून बाहेर पडण्याचा वेदान्त आणि अमूल्या प्रयत्न करतायत.  पुढच्या भागात हे पाहणं औत्सुक्याचं असेल की खेळात जिंकलेली ही ३६ गुणी जोडी, प्रेमात ही जिंकेल का? ह्या मालिकेने नुकतेच आपले १०० एपिसोड पूर्ण केलेत या निमित्ताने सेटवर सेलीब्रेशन करण्यात  आलं, त्यावेळेस संपूर्ण टीम उत्साहित होती.

तेव्हा पाहायला  विसरू नका ही यंग जनरेशन मालिका ‘३६ गुणी जोडी’ सोमवार ते शनिवार संध्या ६:३० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.

Leave a Reply

%d bloggers like this: