परिचारिकांनी अंधश्रध्दा निर्मूलन करावे – डाॅ.कुमार सप्तर्षी
पुणे : “अपल्याकडे अंधश्रध्देचे प्रमाण मोठे आहे.अनेकजण वैद्यकीय उपचारापेक्षा बुवा मांत्रिकाकडे जातात.डाॅक्टरांपेक्षा परिचारिकांचा रुग्णांशी संपर्क अधिक असतो.त्यांनी लोकांच्या अंधश्रध्दा दूर करायचा प्रयत्न करावा.”असे प्रतिपादन डाॅ.कुमार सप्तर्षी यांनी केले.निमित्त होते अं.नि.स.पुणेतर्फे त्यांच्या हस्ते करण्यात आलेला २५ परिचारिकांचा सत्कार.जागतिक परिचारिका दिनानिमित्त हा कार्यक्रम घेण्यात आला.लोकायतच्या अलका जोशी अध्यक्ष स्थानी होत्या.अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे काम महत्वाचे असून आम्ही ते नक्की करू अशी प्रतिक्रिया परिचारिकांनी दिली.वेगवेगळ्या हाॅस्पिटलमधल्या २५ परिचारिकांचा सत्कार या वेळी करण्यात आला.नंदिनी जाधव यांनी या वेळी चमत्कार प्रात्यक्षिक करून दाखविले.श्रीपाल ललवाणी यांनी अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या कार्याची माहिती दिली.वसंत कदम यांनी प्रास्तविक केले.प्रकाश भारद्वाज यांनी आभारप्रदर्शन केले तर अनिल वेल्हाळ यांनी सूत्र संचालन केले.