fbpx

अमित साध ने त्याच्या आगामी ‘मेन’ चित्रपटा मधील झलक केली शेअर !

पहिले शेड्यूल पूर्ण केल्यानंतर गेल्या वर्षी अभिनेता अमित साधने नुकतेच यूवी फिल्म्सच्या ” मेन ” चित्रपटाच्या दुसऱ्या शेड्यूलचे शूटिंग मुंबईत सुरू केले आहे. आउटडोअर शूटच्या दरम्यान ची एक खास झलक त्याने शेयर केली आहे.

गेल्या महिन्यात सुट्टी घेऊन स्वतः ला मस्त रिचार्ज करत हा अभिनेता पुन्हा एका पोलिसाच्या पात्रात परत येण्यासाठी उत्सुक झालेला दिसत होता. मुंबईत तापमान वाढत असताना या अभिनेत्याचा मेनच्या स्टिलमध्ये सुपर हॉट दिसतोय.

मेन हे एक कॉप ड्रामा आहे, जो सामर्थ्यशाली संदेशासह सामाजिक संदेश देणार आहे. ज्यामुळे अभिनेत्याने लगेचच या प्रोजेक्ट ला हो म्हटलं आहे. अमित मेन मध्ये ईशा देओल तख्तानी, सीमा बिस्वास, तिग्मांशु धुलिया आणि मिलिंद गुणाजी सारख्या काही प्रतिभावान कलाकारांसोबत स्क्रीन स्पेस शेअर करतो. या चित्रपटाचे दिग्दर्शन नवोदित चित्रपट निर्माते सचिन सराफ यांनी केले आहे.

‘ब्रीद’ मधील बौद्धिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याच्या आणि त्याच्या ‘घुसपैथ’ या लघुपटातील फोटो पत्रकाराच्या भूमिकेने सर्वांना थक्क करून सोडलेले, चाहते अमितला ‘मेन’मध्ये पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: