fbpx

ग्लेनमार्क ने भारतात उच्च रक्तदाब जागरूकता मोहीमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे : नावीन्यतेवर केंद्रित असलेली जागतिक औषध कंपनी ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेडने (ग्लेनमार्क) मे महिना हा उच्च रक्तदाब जागरूकता महिना म्हणून पाळला. ग्लेनमार्कने देशभरातील १४३ शहरांमधील २१० हून अधिक रुग्णालये आणि क्लिनिकमधील १००० हून अधिक आरोग्यसेवा व्यावसायिकांशी (एचसीपी) भागीदारी करून हायपरटेन्शन बाबत (उच्च रक्तदाब) जनजागृती करण्यासाठी २१४ जनजागृती रॅली आणि तपासणी शिबिरे आयोजित केली.

या रॅलींमध्ये एचसीपींच्या नेतृत्वातील माहितीपूर्ण सत्रांचा समावेश होता. त्यांनी हायपरटेन्शन शी संबंधित लक्षणे, चिन्हे आणि प्रतिबंधात्मक उपायांबद्दल तपशीलवार माहिती दिली. त्यानंतर, सामान्य लोकांना त्यांच्या रक्तदाबाची पातळी तपासून पाहण्याची संधी देण्यासाठी रक्तदाब तपासणी शिबिरे आयोजित करण्यात आली. या उपक्रमाचा परिणाम म्हणून, ग्लेनमार्कने १ कोटी प्रौढांशी संपर्क साधला आणि या रोगाबद्दल प्रभावीपणे जागरूकता वाढवली.

या कार्यक्रमाविषयी बोलताना, ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लि.चे कार्यकारी उपाध्यक्ष आणि इंडिया फॉर्म्युलेशनचे प्रमुख आलोक मलिक म्हणाले, ग्लेनमार्कमध्ये आम्ही उच्च रक्तदाबाविरुद्धच्या लढ्यात जनजागृती करून सार्थक प्रभाव पाडण्यासाठी कटिबद्ध आहोत. या सायलेंट किलरचा प्रसार वाढत आहे त्यामुळे १८ वर्षांवरील तरुण प्रौढांसह सर्वच भारतीयांमध्ये याबद्दल जागरुकता वाढवण्यास आपण प्राधान्य देणे महत्त्वाचे आहे. आमच्या या उपक्रमांद्वारे लोकांना जोखीम, तसेच लवकर निदान करणे आणि त्याचे व्यवस्थापन यांबाबत ज्ञान देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे, या आजारामुळे बाधित झालेल्या लाखो लोकांच्या आरोग्यात सुधारणा घडवून आणण्यात आपण एकत्रितपणे लक्षणीय फरक करू शकतो.

भारतीय लोकांमध्ये उच्च रक्तदाबाबाबत जागरूकता निर्माण करणे आणि त्याचे लवकर निदान करणे याला प्रोत्साहन देण्यात ग्लेनमार्क सदैव आघाडीवर राहिली आहे. उच्च रक्तदाबावरील आपल्या टेल्मा या औषधाद्वारे ग्लेनमार्क ही उच्च रक्तदाबाच्या क्षेत्रात अग्रणी म्हणून उदयास आली आहे, त्यातून या आरोग्यविषयक चिंतेचे निराकरण करण्याबाबत तिची कटिबद्धता दिसून आली आहे. कंपनीने १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या भारतीय प्रौढांसाठी उच्च रक्तदाब जागरूकता आणि तपासणीसाठी #TakeChargeAt18 ही मोहीम देखील सुरू केली होती.

कंपनीने आपल्या http://www.bpincontrol.in या डिजिटल प्लॅटफॉर्मसह अनेक चॅनेल आणि मोहिमांद्वारे लाखो भारतीय प्रौढांशी यापूर्वीच संपर्क केला आहे. ग्लेनमार्कने २०२० मध्ये एचएसआय (हायपरटेन्शन सोसायटी ऑफ इंडिया) आणि एपीआय (असोसिएशन ऑफ फिजिशियन ऑफ इंडिया) यांच्या सहकाऱ्याने जगातील पहिले हायपरटेन्शन जागरूकता चिन्ह – द बीपी लोगो सादर केले होते.

हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांसाठी (सीव्हीडी) जोखमीचा घटक असलेल्या उच्च रक्तदाबाने भारतातील अंदाजे ३० टक्के प्रौढ बाधित आहेत. चिंताजनक बाब म्हणजे सीव्हीडी हे देशातील मृत्यूचे प्रमुख कारण असून ते मृत्यूच्या सर्व घटनांपैकी जवळजवळ एक तृतीयांश घटनांसाठी जबाबदार आहे. या समस्येचा प्रभावीपणे सामना करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून भारताने २०२५ पर्यंत १८ वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींमधील उच्च रक्तदाबाचे (बीपी) प्रमाण २५ टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी उच्च रक्तदाबाविषयी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे, कारण या रोगाचा सामना करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी ते एक महत्त्वाचे साधन ठरते. याशिवाय अधिक जागरूकतेमुळे या आजाराचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रभावी धोरणांचा अवलंब करण्याचे महत्त्वही अधोरेखित होईल.

Leave a Reply

%d bloggers like this: