fbpx

कोण होणार करोडपती पर्व चौथे : तब्बल 14 लाख लोकांनी अजमावले आपले नशीब; नवीन पर्वही असणार खास

पुणे ; ‘कोण होणार करोडपती’ मध्ये आपल्या ज्ञानाच्या जोरावर करोडपती होण्यासाठी अनेक जण आपले नशीब आजमावत असतात. सोनी मराठीवर येत्या 29 मे पासून सोनी मराठी वाहिनीवर ‘कोण होणार करोडपती’ चे नवे पर्व सुरू हॉट आहे, या पर्वात  सहभागी होण्यासाठी मिस कॉल करणे आवश्यक होते, यासाठी देण्यात आलेल्या क्रमांकावर यावेळी तब्बल 14 लाख लोकांनी मिसकॉल देत या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे, अशी माहिती पुण्यामध्ये पत्रकारांशी संवाद साधताना ‘कोण होणार करोडपती’ च्या टीमने दिली. 

यावेळो बोलताना ‘कोण होणार करोडपती’चे सूत्रसंचालक, सुप्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर म्हणाले, आता मागे नाही राहायचं, आपल्या माणसाला जिंकताना बघायचं, अशी या पर्वाची टॅग लाईन आहे. प्रत्येक मराठी माणसाची थोड्या फार प्रमाणात अशीच मानसिकता असते. आपण अधिक सावधपणे पावलं टाकत असतो. मी नाटकांमध्ये काम करायचो तेंव्हा  मालिकांबद्दल विचारणा व्हायची तर  मी पण असाच, जाऊ दे ना कशाला . . बर चालयं ना, अशी माझी ही मानसिकता असायची. पण एक पाऊल तसंच पुढे टाकताना आपण एक पाऊल मागे जात असतो. त्यामुळे आता मागे नाही राहायचं. मला नेहमी वाटतं की सामान्य ज्ञानाचा कसा अभ्यास करणार? स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे अनेक स्पर्धक या खेळात येतात. पण स्पर्धा परीक्षांची तयारी म्हणजे सगळी तयारी नाही. कारण सर्वच स्पर्धक अभ्यास करून आलेलेच असतात पण हॉट सीटवर बसल्यावर काही सुचतच नाही. अशावेळी स्पर्धकांना रीलॅक्सिंग वातावरण तयार करून देणं ही मोठी जबाबदारी असते माझ्यावर. 

‘कोण होणार करोडपती’ मधील ‘कोण ?’ हा त्यावेळी  हॉट सीटवर बसलेला व्यक्ती असेल असे, व्यक्तीचित्र निर्माण करणारा प्रत्येक एपिसोड करण्यात येणार आहे. त्याप्रत्येक स्पर्धकांचा व्हिडिओ तर असणारच आहे. पण प्रेक्षकांना खेळांपेक्षा जास्त त्या स्पर्धकाविषयी कळावे यासाठी अधिक प्रयत्न केले जाणार आहेत. कारण त्या दिवशी तो किंवा ती स्पर्धक हेच नायक असणार आहे, असेही खेकर यांनी सांगितले.  

सोनी मराठीचे बिजनेस हेड अजय भालवणकर म्हणाले, ‘कोण होणार करोडपती’चे हे चौथे पर्व आहे. या चौथ्या पर्वाची वैशिष्ठ म्हणजे यंदा बक्षीसाची रक्कम डबल म्हणजे दोन करोड रुपयाचे करण्यात आली आहे. शिवाय यंदा 15 ऐवजी 16 प्रश्नांचा खेळ असणार आहे. विशेष म्हणजे यंदाच्या पर्वात सहभागी होण्यासाठी 14 लाख मिसकॉल आले आहेत. जी संख्या मागीळवरशीपेक्षा दुपतीपेक्षा जास्त आहे. त्यातील दोनशे स्पर्धकांची या पर्वासाठी निवड करण्यात आली आहे. 

सोनी मराठीचे क्रिएटिव्ह डायरेक्टर अमित फाळके म्हणाले,  एखाद्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणं आणि ‘कोण होणार करोडपती’ च सूत्रसंचालन करणं ही पूर्णपणे एक वेगळी गोष्ट आहे. कारण या कार्यक्रमात तांत्रिकबाबी अधिक आहेत. सचिन खेडेकर यांच्या प्रत्येक शब्दावर हा खेळ पुढे सारकतो. मात्र बॅक ऑफ द स्टेज अनेक तंत्रज्ञ त्यासाठी त्यावेळी काम करत असतात.

Leave a Reply

%d bloggers like this: