fbpx

पॅरिस येथे होणाऱ्या पॅराऍथलेटिक वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी पुण्याच्या सचिन खिलारेची निवड

पुणे : ८ जुलै पासून पॅरिसमध्ये होणाऱ्या पॅराऍथलेटिक वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेतील गोळाफेक प्रकारात आझम स्पोर्ट्स अकादमीच्या सचिन सर्जेराव खिलारे यांची निवड करण्यात आली आहे. ( Pune’s Sachin Khilare selected for Paraathletic World Championship to be held in Paris)

पुण्यातील आझम स्पोर्ट्स अकादमी येथे सराव करणाऱ्या सचिन खिलारे यांना निवडीचे पत्र पॅरालम्पिक कमिटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष सत्य नारायण यांनी दिले आहे. नुकत्याच कर्नाटक येथील बंगळूर येथे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत सचिनने १६.१३ मीटर गोळाफेक करताना सुवर्णपदकाची कमाई केली होती. त्याने केलेल्या कामगिरीमुळेच त्याची निवड या स्पर्धेसाठी झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून सचिन आझम स्पोर्ट्स अकादमी येथील मैदानावर सराव करत असून गोळाफेक प्रकारातील उदयोन्मुख खेळाडूंना मार्गदर्शन देखील करत आहे.

महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार, उपाध्यक्षा आबेदा इनामदार, आझम स्पोर्ट्स अकादमीचे संचालक डॉ. गुलजार शेख यांनी आगामी स्पर्धेसाठी व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: