fbpx

अहिल्यादेवी होळकर जयंती यंदा प्रथमच नवी दिल्लीत होणार साजरी

पुणे  : राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची २९८ वी जयंती यंदा प्रथमच नवी दिल्ली येथे साजरी करण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे जिल्हा, पुणे शहर व पिंपरी-चिंचवड शहरातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक व राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर व पुणे जिल्हाध्यक्ष विनायक रुपनवर यांनी दिली.

राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा खरा परिचय देश पातळीवर करून देण्याच्या उद्देशाने जयंती कार्यक्रमाचे नवी दिल्लीतील श्री सत्य साई ऑडोटोरियम येथे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन 31 मे रोजी सायंकाळी 5.00 वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याच्या माजी मंत्री पंकजा मुंडे असणार आहेत. यावेळी राज्यसभेचे खासदार पी. विल्सन, आग्रा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रबल प्रताप सिंह, शेफर्ड इंडिया इंटरनॅशनल संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष एच. विश्वनाथ, तेलंगणा विधानपरिषद सदस्य येगे मल्लेश्याम, गुजरातचे माजी खासदार सागर राईका, रासेफचे राष्ट्रीय अध्यक्ष एस.एल. अक्कीसागर, राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रभारी रामकुमार पाल, रासपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शिवते, मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर आदी उपस्थित राहणार आहेत. 

राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती प्रथमच नवी दिल्ली येथे असल्याने अहिल्यादेवींच्या विचारांचा जागर देशाच्या राजधानीत घुमणार आहे. यशवंत सेनेच्या माध्यमातून प्रथम चौंडी येथे जयंती साजरी करून नंतर मुंबई व आता दिल्ली येथे साजरी होणार आहे. त्यामुळे कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन विनायक रुपनवर यांनी केले आहे. 

Leave a Reply

%d bloggers like this: