एएलडी ऑटोमोटिव्हने लीजप्लॅनचे अधिग्रहण यशस्वीपणे पूर्ण; स्थानिक व्यवस्थापनामध्ये बदलांची घोषणा
एएलडी ऑटोमोटिव्हने लीजप्लॅनचे १००% अधिग्रहण यशस्वीपणे पूर्ण केले आहे. लीजप्लॅन ही ताफा व्यवस्थापन आणि मोबिलिटी क्षेत्रातील जगातील एक आघाडीची कंपनी आहे. एएलडी ऑटोमोटिव्हने टीडीआर कॅपिटलच्या नेतृत्वाखालील एका कंपनी समूहाकडून लीजप्लॅनचे अधिग्रहण केले आहे.
हे परिवर्तनात्मक अधिग्रहण कंपनीच्या वाटचालीतील एक खूप मोठा बदल दर्शवते. अधिग्रहणानंतर एकत्र आलेल्या या दोन्ही कंपन्यांकडून जगभरात व्यवस्थापित केल्या जात असलेल्या वाहनांची एकूण संख्या ३.३ मिलियन झाली असून, आता हा सस्टेनेबल मोबिलिटी क्षेत्रातील जागतिक पातळीवरील आघाडीचा उद्योगसमूह बनला आहे. एएलडी ऑटोमोटिव्ह आणि लीजप्लॅन एकत्र मिळून नेट झिरो उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या वाटचालीचे नेतृत्व करतील व या उद्योगक्षेत्रातील डिजिटल परिवर्तनाला आकार देतील. या दोन्ही कंपन्या मिळून एकमेकांना अनुरूप असलेल्या वृद्धी क्षमतांच्या बळावर आपली स्पर्धात्मकता मजबूत करतील आणि शाश्वत वृद्धी साध्य करतील.
हे अधिग्रहण पूर्ण झाल्यानंतर, एएलडी ऑटोमोटिव्ह आणि लीजप्लॅन एक कंपनी म्हणून एकत्र येण्याची प्रक्रिया भारतात सुरु करतील. नियामक मंजुरी मिळाल्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण होईल.
भारतामध्ये या कंपनीच्या धोरणात्मक विकासाचे नेतृत्व करण्यासाठी एएलडी ऑटोमोटिव्हचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर टीम अल्बर्टसॅन यांनी भारतामधील एएलडी ऑटोमोटिव्हचे माजी जनरल मॅनेजर श्री सुवजित कर्माकर यांना कंट्री मॅनेजिंग डायरेक्टर व एशिया सब-रिजनल डायरेक्टर म्हणून मलेशिया व थायलंडमधील समूहाच्या व्यवसायावर लक्ष ठेवण्यासाठी नियुक्त केले आहे. ही नियुक्ती तातडीने लागू करण्यात आली आहे.
एएलडी ऑटोमोटिव्ह आणि लीजप्लॅन एकत्र येऊन तयार होणाऱ्या कंपनीच्या आव्हानात्मक एकत्रीकरण योजनेच्या अंमलबजावणीसाठी आणि येत्या महिन्यांसाठी व वर्षांसाठी उद्दिष्ट म्हणून ठरवण्यात आलेली धोरणात्मक विकास वृद्धी यशस्वीपणे साध्य करण्यासाठी निवडण्यात आलेल्या प्रमुख प्रतिभावंतांमध्ये सुवजित कर्माकर यांचा समावेश आहे.
