Saturday, June 6, 2026
Latest NewsPUNE

मनीष जगदाळे यांची विभागप्रमुखपदी नियुक्ती

पुणे : मनीष जगदाळे यांची खडकवासला विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ३३ आणि ३४ शिवसेना विभागप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने पुणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती कळविण्यात आली आहे.

पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिनजी अहिर, शहरप्रमुख गजानन थरकुडे, उपशहर प्रमुख भारत कुंभारकर, खडकवासला विधानसभा अध्यक्ष नितीन वाघ यांनी जगदाळे यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading