Sunday, June 7, 2026
BusinessLatest News

मिंडा कॉर्पोरेशनकडून उद्योग वाढीपेक्षा अधिक उत्तम कामगिरी

पुणेमिंडा कॉर्पोरेशन (मिंडा कॉर्प किंवा कंपनी म्‍हणून संदर्भितएनएसई: MINDACORPबीएसई: ५३८९६२) या स्‍पार्क  मिंडाच्‍या प्रमुख कंपनीने आज ३१ मार्च २०२३ रोजी संपलेल्‍या चौथ्‍या तिमाहीसाठी आणि संपूर्ण वर्षासाठी त्‍यांच्‍या आर्थिक निकालांची घोषणा केली. विकासगती कायम राखत कंपनीने सलग ११व्‍या तिमाहीसाठी दोन अंकी ईबीआयटीडीए मार्जिनसह उद्योग वाढीपेक्षा अधिक उत्तम कामगिरी केली.

या निकालांबाबत आपले मत व्‍यक्‍त करत अध्‍यक्ष व ग्रुप सीईओ अशोक मिंडा म्‍हणाले, ‘‘मला जाहीर करताना आनंद होत आहे की, मिंडा कॉर्पोरेशनने आर्थिक वर्ष २२-२३ मध्‍ये लक्षणीय महसूल वाढ संपादित केली आहे, ज्‍यामधून दोन-अंकी ईबीआयटीडीए मार्जिन्‍ससह उल्‍लेखनीय ४५ टक्‍क्‍यांची वार्षिक वाढ दिसून येते. या उल्‍लेखनीय कामगिरीचे श्रेय आमचा प्रबळ उत्‍पादन पोर्टफोलिओ, वाढणारा ग्राहकवर्ग आणि उत्‍पादनाचे प्रिमिअमीझेशन करण्‍यावर भर या बाबींना जाते. आमच्‍या भागधारकांच्‍या सन्‍मानार्थ संचालक मंडळाने दर्शनी किंमतीवर ४० टक्‍क्‍यांच्‍या म्‍हणजेच प्रति इक्विटी शेअर ०.८० रूपयांच्‍या अंतिम लाभांशाची शिफारस केली आहे, ज्‍यामुळे संपूर्ण वर्षासाठी एकूण लाभांश ६० टक्‍के म्‍हणजेच प्रति इक्विटी शेअर १.२० रूपये झाला आहे. आम्‍ही अधिक पुढे जात आमच्‍या सर्व भागधारकांना अपवादात्‍मक मूल्‍य वितरित करण्‍यासाठी ग्राहककेंद्रितपणानवोन्‍मेष्‍काराला चालना आणि संशोधन व विकास प्रगत करण्‍यावर लक्ष केंद्रित करू.’’

आर्थिक वर्ष २३ मध्‍ये मिंडा कॉर्पोरेशनने लोकोनॅव्‍ह व डेसुंग एल्‍टेकसोबत धोरणात्‍मक तंत्रज्ञान सहयोगांच्‍या माध्‍यमातून टेलिमॅटिक्‍स सॉफ्टवेअर व एडीएएसमध्‍ये सर्वसमावेशक सोल्‍यूशन्‍सचे अव्‍वल प्रदाता म्‍हणून स्‍वत:चे स्‍थान दृढ केले. या सहयोगांनी कंपनीला ऑटोमोटिव्‍ह उद्योग सुधारणांच्‍या अग्रस्‍थानी ठेवले आहे, ज्‍यामुळे अत्‍याधुनिक सोल्‍यूशन्‍सचे वितरण सक्षम होत आहे. गेल्‍या तिमाहीदरम्‍यान तंत्रज्ञानावर सातत्‍यपूर्ण फोकससह कंपनीने २० पेटण्‍ट्स दाखल केले, ज्‍यामुळे एकूण पेटण्‍ट्सची संख्‍या २५० हून अधिकपर्यंत पोहोचली आहे. ऑटोमोटिव्‍ह उद्योगाने विविध विभागांमध्‍ये समाधानकारक कामगिरी दाखवली. देशांतर्गत ऑटो बाजारपेठेने प्रामुख्‍याने प्रबळ शहरी विक्रीसह सकारात्‍मक विकासाची नोंद केली. पण, जागतिक भूराजकीय घटकांमुळे निर्यातींना आव्‍हानांचा सामना करावा लागला. किफायतशीरपणा व इंधनाचा वाढता खर्च यांबाबतच्‍या समस्‍यांमुळे दुचाकी मागणी मंदावली.

ओईएमसह प्रबळ ऑर्डर बुक आणि नवीन उत्‍पादनांच्‍या सादरीकरणामुळे प्रवासी वाहनासाठी मागणी प्रबळ राहिली. याव्यतिरिक्त, सरकारच्या वेगवान पायाभूत सुविधा खर्चामुळे व्यावसायिक वाहनांच्या मागणीत वाढ झाली. ट्रॅक्टर सेगमेंटने वाढीमध्ये उल्लेखनीय वाढ केली, प्रबळ दुहेरी अंकी वाढीसह अपेक्षांना मागे टाकले.

आर्थिक वर्ष २३ समाप्‍त होण्‍याच्‍या टप्‍प्‍यावर असताना सेमीकंडक्‍टर पुरवठ्यामधील अडथळे कमी झाले आहेत आणि आर्थिक वर्ष २३ या दुस-या तिमाहीमध्‍ये तात्‍पुरत्‍या घसरणीनंतर वस्‍तूच्‍या किंमती पुन्हा वाढू लागल्‍या आहेत. पण, आमच्या कच्च्या मालाचा बराचसा भाग ग्राहक निर्देशांकाशी जोडलेला आहे हे मान्य करणे महत्त्वाचे आहे. आपल्‍या प्रगती करण्‍याच्‍या धोरणाचा भाग म्‍हणून मिंडा कॉर्पोरेशन विकासला चालना देण्‍याच्‍या टप्‍प्यावर आहे, ज्‍याचे श्रेय त्‍यांची प्रबळ मुलभूत तत्त्वे, दर्जाप्रती कटिबद्धता, ग्राहक-केंद्रित दृष्टिकोन आणि नवोन्‍मेष्‍कारी व संशोधन व विकासावर निरंतर फोकसला जाते.

आगामी आर्थिक वर्षामध्‍ये उत्कृष्‍टतेला प्राधान्‍य देईल आणि आमच्‍या भागधारकांना अपवादात्‍मक मूल्‍य देण्‍याच्‍या खात्रीसाठी अपेक्षांच्‍या पुढे जाईल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading