fbpx
Friday, April 26, 2024
Latest NewsPUNE

पाषाण मधील नागरिकांची पाण्याची समस्या दूर होणार; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

पुणे : पाषाण मध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून, त्यातील अडथळे लवकरच दूर करुन पाषाणमधील नागरिकांना बाणेर-बालेवाडीप्रमाणे सुरळीत पाणीपुरवठा होईल, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. थेट भेट उपक्रमाच्या माध्यमातून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी पाषाणमधील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

यावेळी भाजपा कोथरुड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, भाजपा नेते गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, राहूल कोकाटे, सनी निम्हण, रोहन कोकाटे, औंध क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त संदीप कलाटे यांच्या सह इतर अनेक मान्यवर आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.

यावेळी कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, वाहतूक कोंडी, कचऱ्याची समस्या, पोलीस गस्त वाढविणे, योग अभ्यास केंद्र उपलब्ध करून देणे आदी समस्या स्थानिक नागरिकांनी चंद्रकांत पाटील यांच्या समोर मांडल्या. त्यावर संबंधित अधिकाऱ्यांना सर्व समस्या तातडीने दूर करण्याच्या सूचना दिल्या. तसेच कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावर अधिक्षक अभियंता अनिरुद्ध पावसकर यांच्याशी फोनवर संपर्क साधून, पाणीपुरवठा सुरळीत करण्याची सूचना पाटील यांनी केली‌‌.

त्यासोबतच चुकीच्या पद्धतीने वाहन चालवून वाहतूक कोंडी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश पाटील यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिले. तसेच योग अभ्यासासाठी आयुक्तांसोबत चर्चा करुन केंद्र सुरू करण्याचे निर्णय घेण्याची ग्वाही यावेळी पाटील यांनी यावेळी दिली.

पाटील यांनी लोकसहभागातून स्वच्छच्या माध्यमातून कचरा संकलन सुरू केल्याबाबत सर्व नागरिकांनी समाधान व्यक्त केले. मात्र, महामार्गालगत काहीजण राडारोडा टाकून वाहतुकीस अडथळा निर्माण करत असल्याचे, पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावरही लवकरच तोडगा काढण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading