डिजिटल व्यवहारांसाठी मोबाइल मध्येच इन्बिल्ट UPI 123 PAY सह Nokia 105 (2023) आणि Nokia 106 4G
नवी दिल्ली: नोकिया फोनची उत्पादक कंपनी (द होम ऑफ नोकिया फोन्स) एचएमडी ग्लोबलने बाजारातील त्यांच्या आघाडीच्या फिचर फोन पोर्टफोलओमध्ये नवीन Nokia 105 (2023) आणि Nokia 106 4G हे अजून दोन फीचर फोन जोडण्याची आज घोषणा केली. मोबाइलमध्येच इन्बिल्ट UPI123PAY या वैशिष्ठ्याच्या कार्यक्षमतेसह हे फोन असून यामुळे या फोन मध्ये नोकिया फोनच्या विश्वसनीय विश्वासार्हतेसह यूपीआयच्या सोयी आणि यूपीआयची सहज उपलब्धता एकत्रित येते. वापरकर्त्यांना स्मार्टफोनच्या शिवाय सुद्धा सुरक्षितपणे आणि अखंड डिजिटल व्यवहार करण्यास सक्षम करते.
UPI123PAY ही फिचर फोन वापरकर्त्यांसाठी एनपीसीआय (NPCI)ची झटपट पेमेंट प्रणाली आहे, जे सुरक्षित आणि विश्वसनीय पद्धतीने यूनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) सेवा वापरू शकतात. UPI123PAY द्वारे, फिचर फोन वापरकर्ते आयव्हीआर (इंटरॅक्टिव व्हॉइस रिस्पॉन्स) नंबरवर कॉल करणे, फिचर फोनमधील अॅप कार्यक्षमता, मिस्ड कॉल आधारित दृष्टिकोन आणि आसपास च्या किंवा जवळच्या आवाजावर आधारित पेमेंट या चार तंत्रज्ञान पर्यायांवर आधारित अनेक व्यवहार करू शकतील.
अविश्वसनीय बॅटरी लाइफ, साधेपणा आणि सहज उपलब्ध प्राइस पॉइंट यांसह हे दोन्ही फोन नोकियाकडून अपेक्षित असलेली विश्वसनीयता आणि आश्वस्थता देतात.
एचएमडी ग्लोबलचे भारत आणि एशिया पॅसिफिकचे उपाध्यक्ष रवी कुमार म्हणाले, “यूपीआय वैशिष्ठ्यांची ओळख करून देणारे Nokia 105 (2023) आणि Nokia 106 4G हे बाजारातील आघाडीचे फिचर फोन बाजारात आणताना आम्हाला खूप आनंद होत आहे. आमच्या फिचर फोन्समध्ये यूपीआय फिचर आणून आम्ही फिचर फोन वापरकर्त्यांना सुरक्षित, सोयीस्कर असे डिजिटल व्यवहार सहजतेने करण्याची आणि काळासोबत पुढे जाण्याच्या क्षमतेसह सक्षम बनवण्याचे आमचे ध्येय आहे. आमचे खास प्रिय असे फिचर फोन Nokia 105 (2023) आणि Nokia 106 4G मध्ये यूपीआय आणून आम्ही समाजातील डिजिटल दरी कमी करण्याचा आणि सर्वांसाठी आर्थिक उपलब्धता अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहोत.”
एनपीसीआय च्या मुख्य ऑपरेटिंग अधिकारी सुश्री प्रवीण राय म्हणाल्या, “नोकिया फिचर फोन्स मध्ये UPI123PAY कार्यक्षमता आणण्यासाठी एचएमडी ग्लोबल सोबत सहकारी करताना आम्हाला आनंद होत आहे. ही भागीदारी आम्हाला अधिक वापरकरत्यांपर्यंत यूपीआयची सुविधा आणि उपलब्धता वाढवण्यास मदत करते, ज्यामुळे किफायतशीर व परवडणार्या मोबाइल उपकरणांवरून अखंड व सुरक्षित डिजिटल व्यवहार करता येणे शक्य होईल. आमचा विश्वास आहे की, फिचर फोन वापरकर्त्यांना यूपीआय क्षमतेसह फोन मिळाल्याने अधिक वापरकर्त्यांना यूपीआय वापरण्याची सोय आणि सुविधा मिळून डिजिटल वित्तीय सेवांचा अवलंब करण्यास त्यांना प्रोत्साहन मिळेल.”
गपशप चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. बिरुद शेठ म्हणाले, “खऱ्या अर्थाने आर्थिक समावेशन प्रत्यक्षात येण्यासाठी देयके आणि वाणिज्य एकत्र येणे आवश्यक आहे. स्मार्ट फोन वापरकर्त्यांसाठी ही सोय उपलब्ध असताना फिचर फोन ग्राहकांचा एक मोठा भाग मोबाइल पेमेंटच्या परिवर्तनीय शक्तीपासून दूर होता. फिचरफोन मध्ये यूपीआय ची उपाययोजना जोडून आम्ही लोकांसाठी असे काही तरी आणले आहे जे त्यांना आर्थिक समावेशनाच्या जवळ आणेल आणि त्याबाबत सक्षम करेल आणि अशी लोकांसाठी सुविधा आणल्याबाबत आम्हाला अत्यंत अभिमान वाटत आहे. या उपक्रमासाठी एनपीसीआय चे समर्थन मिळाल्याबद्दल आणि यूपीआय व डिजिटल पेमेंट अधिक सर्वव्यापी बनवण्यासाठी नोकिया मोबाइल सोबत काम करताना आम्हाला आनंद होत आहे.”
तुम्हाला सतत जोडलेले ठेवण्यासाठी तयार केलेले Nokia 106 4G ने अगदी कठीण वातावरणात ही टिकाव धरावा आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये अखंड कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करण्यासाठी त्यास कठोर अशा टिकाऊपणा चाचण्यांमधून जावे लागते. कीमॅटवरील प्रत्येक बटणांमधील अंतर काळजीपूर्वक विचारात घेतलयाने अंधारातसुद्धा डायल करणे आणि मजकूर पाठवणे सोपे होते. तुम्ही मेसेज पाठवित असाल, माहिती शोधत असाल किंवा गेम खेळत असाल ; काहीही करील असाल तरीही आयपीएस डिस्प्ले तंत्रज्ञान उत्तम दृश्यमानतेसह जास्त चांगले अॅंगल आणि रंग पुनरुत्पादनासह स्पष्ट दृश्ये आणतात.
वर्धित वापरकर्ता अनुभव आणि सुधारित ध्वनी:
नोकिया १०५ चे अर्गोनॉमिक डिझाईन आणि कॉम्पॅक्ट आकार हातात छान वाटण्यासाठी आणि तुम्हाला बाहेर जाताना सहज खिशाट ठेवता यावा यासाठी तयार केलेले आहे.
दिवसभर चालणारी बॅटरी:
दिवसभर बॅटरी चालावी यासाठी नोकिया १०५ अपग्रेड केल्याने १००० mAh बॅटरीसह ते सुसज्ज आहे, जी आधीच्या मोबाइलच्या बॅटरीपेक्षा २५% नी मोठी आहे, जी जास्त स्टँड बाय वेळ देते आणि सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत जास्त दिवसभर अखंड संभाषण करणे शक्य करते.
तर, Nokia 106 4G मध्ये १४५० mAh एवढी बॅटरी वाढवलेली असल्याने ते बरेच तास टॉक टाइम देते. वापरकर्ते स्टँड बाय मोड मध्ये किती तरी आठवडे राहू शकतात आणि वारंवार रिचार्ज करण्याची चिंता न करता त्यांच्या संवादाच्या गरजा पूर्ण झाल्याची खात्री बाळगू शकतात.
मनोरंजन आणि वैशिष्ठ्ये:
वापरकर्त्यांचे मनोरंजन करण्यासाठी आणि त्यांना सक्रिय ठेवण्यासाठी डिझाईन केलेल्या वैशिष्ठ्यांनी Nokia 105 (2023) आणि Nokia 106 4G भरलेले आहेत. हे एक वायरलेस एफएम रेडियो प्रदान करते, ज्यामुळे वापरकर्त्यांना हेडसेट शिवाय त्यांचे आवडते रेडियो स्टेशन ऐकता येते. याव्यतिरिक्त Nokia 106 4G मध्ये अंतर्निहित एमपी३ प्लेयर आहे, ज्यामुळे वापरकर्ते त्यांच्या आवडत्या गाण्याची लिस्ट ते जिथे जातील तेथे नेऊ शकतात.
टिकण्यासाठी बनविलेले:
नोकियाला टिकाऊपणाचे महत्व समजले आहे आणि प्रत्येक नोकिया फोन दैनंदिन वापरातील आव्हानांना तोंड देऊ शकतो याची खात्री करण्यासाठी काळजीपूर्वक चाचणी केली जाते. Nokia 105 (2023) आणि Nokia 106 4G सुद्धा यास अपवाद नाहीत. उत्कटतेने बनविलेले आणि प्रचंड मागणीच्या परिस्थितीमध्ये सुद्धा अपवादात्मक कामगिरी देण्यासाठी डिझाईन केलेले आहेत.
किंमत आणि उपलब्धता:
Nokia 105 (2023) आणि Nokia 106 4G भारतात १८ मे पासून उपलब्ध होतील आणि त्यांची अनुक्रमे किंमत रु. १२९९/- व रु. २१९९/- फक्त एवढी असेल. Nokia 105 (2023) चारकोल, निळसर आणि लाल रंगात उपलब्ध आहेत आणि Nokia 106 4G चारकोल, निळ्या रंगात उपलब्ध आहेत.
उत्पादनाचे चित्र पाहण्यासाठी या लिंक वर क्लिक करा:
Nokia 105 – https://we.tl/t-Iyz1fGsxBa
Nokia 106 4G – https://we.tl/t-3FWanzQeNl