रानवडी येथे ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाचे आयोजन
पुणे : वेल्हे तहसील कार्यालयाच्यावतीने महाराजस्व अभियानाअंतर्गत ‘शासन आपल्या दारी’ विशेष मोहिमेचे पानशेतजवळील रानवडी येथे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाच्या माध्यमातून एकूण २ हजार ६०५ लाभार्थ्यांना विविध योजना आणि सेवांचा लाभ देण्यात आला आहे.
या मोहिमेअंतर्गत तहसिल कार्यालयाअंतर्गत शिधापत्रिकेतील दुबार नावे कमी किंवा वाढविणे-२७५, सर्व प्रकारचे शासकीय प्रमाणपत्र-४०, नवीन मतदार नोंदणी-५६, नवीन आधार कार्ड नोंदणी किंवा जुन्या आधार कार्डमध्ये दुरुस्ती-६४, संजय गांधी निराधार योजना-३१८, पीएम किसान योजना-२२, पंचायत समिती कार्यालयाअंतर्गत रमाई घरकुल योजनांचे पात्र लाभार्थ्यांना लाभ-३, महात्मा गांधी रोजगार हमी योजना कार्ड वाटप-५०, बचत गट कर्ज मंजूर प्रकरणे-४०, आरोग्य विभागाअंतर्गत रक्ताची तपासणी-५८, डोळ तपासणी करुन चष्मे वाटप-१०७, आभा कार्ड वाटप-३२०, शिक्षण विभागाअंतर्गत दिव्यांग प्रमाणपत्र वाटप-३, निर्वाह भत्ता फार्म वाटप-५, युडीआयडी कार्ड वाटप-६, ग्रामपचांयत विभागाअंतर्गत जन्म मृत्यू प्रमाणपत्र-१०, विवाह नोंदणीसाठी दाखल प्रकरणे-५, मालमत्ता फेरफार व आकारणी दरपत्रक-९३, सर्व प्रकारचे दाखले-२१ या सेवांचा लाभ देण्यात आला.
एकात्मिक बाल विकास विभागाअंतर्गत भाग्यश्री योजना-२, पुरक पोषण आहार वाटप-१ हजार १३०, उपअधिक्षक भुमि अभिलेख कार्यालयांतर्गत शेतीची मोजणी-११, ऑनलाईन प्रॉपटी कार्ड-९, आनलाईन फेरफार-१०, वन विभागाअंतर्गत सहकारी संस्थांना नुकसान भरपाई-२, गॅस अनुदान अर्ज-६३, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी नवीन वीज जोडणीकरीता कोटेशन-१४, प्रलंबित अर्ज निकाली-६ आणि विद्युत देयकात दुरुस्तीची २६ कामे यावेळी करण्यात आली.
कृषि विभागाअंतर्गत २ शेतकऱ्यांना कृषि औजारे वाटप, २५ शेतकऱ्यांना बियाणे व औषधे वाटप, तिघांची महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी, ५ शेतकऱ्यांना मातीपरिक्षण कार्डचे वाटप आणि गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेंअंतर्गत पात्र एका लाभार्थ्यांना लाभ दिल्याची माहिती तहसिलदार दिनेश पारगे यांनी दिली आहे.
पानशेत भागातील नागरिकांसाठी हे अभियान राबविण्यात आले. यावेळी गट विकास अधिकारी पंकज शेळके, तालुका कषि अधिकारी धनंजय कोंढाळकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.