श्री. कुलस्वामिनी मंदिराचा वर्धापन दिन सोहळा २१ मे रोजी
सिंधुदूर्ग : जिल्ह्यातील, कणकवली तालुक्यातील, लोरे नं.१, गुरववाडी येथे श्री कुलस्वामिनी मंदिर वर्धापन दिन सोहळा
मिराशी गुरव समाजाच्या श्री कुलस्वामिनी मंदिराचा वर्धापन दिन सोहळा मु. लोरे नं. १, गुरववाडी तालुका- कणकवली, जिल्हा – सिंधुदूर्ग येथे दिनांक २१ मे २०२३ रोजी संपन्न होणार आहे. त्यानिमित्त शुक्रवार दि. १९ मे २०२३ रोजी नृत्यस्पर्धा, शनिवार दि. २० मे २०२३ रोजी लहान मुला-मुलींसाठी आणि महिलांसाठी विविध स्पर्धा, कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ (सिद्धेश कलिंगण) यांचे ‘गंगाजल’ ट्रिकसिन दशावतार नाटक, रविवार दि. २१ मे २०२३ रोजी सत्यनारायणाची महापूजा, हरिपाठ, भजने, झी टीव्ही फेम ह.भ.प. संगिताताई चोपडे यांचे किर्तन असा भरगच्च कार्यक्रम गुरव समाजाच्या वतीने शुक्रवार दि. १९ ते रविवार दि. २१ मे या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे.
