Saturday, June 6, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

पुणे – छत्रपती संभाजीनगर मार्गावर ई – शिवाई धावणार

पुणे : एसटी महामंडळाच्या वतीने गुरुवारी पुण्यातील  शिवाजीनगर ते छत्रपती संभाजीनगर अशा इलेक्ट्रिक शिवाई बसेस सकाळी सव्वा सहा वाजलेपासून दर एक तासाने सुरू करण्यात आल्या आहेत. .सदरच्या बसेसची रंगसंगती ही आकर्षक असून 45 सीटर आवाज विरहित म्हणजेच नोईज पोल्युशन विरहित बसेस सदर मार्गावर सामील झालेल्या आहेत. सदर बसची वैशिष्ट्ये सदर बस ही1) पूर्णतः वातानुकूलित ,2)पुश बॅक बकेट सीट, 3)पुढील व पाठीमागील बाजूस मराठी व इंग्रजी मधून मार्ग फलक,4)रीडिंग लँपची सुविधा5) प्रवाशांसाठी इमर्जन्सी पॅनिक बटन 6)एलईडी फुट ल्याम्प7) इनसाईड लगेज रॅक 8)तसेच बसच्या बाहेरील बाजूस मोठ्या बॅग व सामानासाठी प्रशस्त सामानाची डिकी9) इमर्जन्सी हॅमर10) प्रवाशांच्या माहितीसाठी चालक केबिन मधून आवश्यक सूचनांसाठी अनाउन्समेंट सिस्टम.


या सर्व सोयीने युक्त असलेलीशिवाई बस चे प्रवास भाडे मात्र शिवशाही प्रमाणेच ठेवण्यात आलेले आहे व सध्या वेगवेगळ्या प्रवर्गासाठी लागू असलेल्या सवलती ,महिला सन्मान योजना , अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवासी तसेच ज्येष्ठ नागरी प्रवासी व दिव्यांगांसाठीच्या सर्व सवलती शिवाई बससाठी लागू राहणार आहेत. सदर बसचे उद्घाटन आज शिवाजीनगर छत्रपती संभाजी नगर बसमधून जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिक प्रवासांच्या हस्ते करण्यात आले यावेळी श्री ज्ञानेश्वर रणवरे आगार व्यवस्थापक वरिष्ठ राप शिवाजीनगर आगार, कार्यकारी अभियंता श्री नागेश कुलकर्णी तसेच ग्रीन सेल कंपनीचे प्रतिनिधी श्री शिव तिवारी , श्री शिवेंदू व आगारातील पर्यवेक्षक व कर्मचारी हजर होते. प्रवाशांनी या नवीन व आकर्षक सेवेचा लाभ घ्यावा असा आव्हान राप महामंडळातर्फे करण्यात येत आहे

शिवाजीनगर ते छत्रपती संभाजीनगर करता ई शिवाई बस करिता प्रवास भाडे रुपये 515 , जेष्ठ नागरिक व महिला सन्मान योजने अंतर्गत सवलतीप्रमाणे प्रवास भाडे रुपये 275 व दिव्यांगांसाठीचे रुपये 180 असे प्रवास भाडे लागू राहील.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading