fbpx
Saturday, September 30, 2023
Latest NewsSports

ब्रिलीयन्ट्स स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी, अजित वाडेकर क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघ उपांत्य फेरीत !!

पुणे : क्रिक् चॅलेंजर्स तर्फे आयोजित ‘पे फेअर करंडक’ अजिंक्यपद १३ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत अजित वाडेकर क्रिकेट अ‍ॅकॅडमी आणि ब्रिलीयन्टस् स्पोर्टस् अ‍ॅकॅडमी या संघांनी प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेत तिसरा विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

येवलेवाडी येथील बापूसाहेब शेलार क्रिकेट (ब्रिलीयन्ट्स स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी) मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत ४५० हून अधिक धावा निघालेल्या या सामन्यात अजित वाडेकर क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाने क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमीचा ७ गडी राखून पराभव केला. सार्थक शिंदे याच्या नाबाद १५३ धावांच्या सर्वोच्च खेळीमुळे क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमीने २२८ धावांचा डोंगर उभा केला. अशा या विशाल धावसंख्येचा यशस्वी पाठलाग अजित वाडेकर क्रिकेट अ‍ॅकॅडमीने केला. स्वराज मोरे (नाबाद ५४ धावा), युवराज मोरे (४५ धावा), श्रवण व्हावळ (४९ धावा) आणि अलंकार पारवे (३४) यांच्या धावांच्या योगदानामुळे अजित वाडेकर संघाने हे आव्हान १ षटक राखून सहज पार केले. अष्टपैलू खेळी करणारा स्वराज मोरे सामनावीर ठरला.

कर्णधार आर्य कुमावत याच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर ब्रिलीयन्टस् स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमीने धीरज जाधव क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा १२२ धावांनी पराभव करून सलग तिसर्‍या विजयाची नोंद केली. पहिल्यांदा फलंदाजी करताना ब्रिलीयन्टस् स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमीने १९७ धावा धावफलकावर लावल्या. शौर्य जाधव याने नाबाद ५२ धावांची रितम सेन याने ३७ धावा तर, आर्य कुमावत याने नाबाद ४७ धावांची खेळी केली. रितम आणि शौर्य यांनी दुसर्‍या गड्यासाठी ५८ चेंडूत ११२ धावांची भागिदारी रचून मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. त्यानंतर आर्य आणि शौर्य यांनी तिसर्‍या गड्यासाठी ३४ चेंडूत ६७ धावांची अभेद्य भागिदारी करून संघाची धावसंख्या १९७ धावांवर पोहचवली. या आव्हानासमोर धीरज जाधव क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा डाव ७२ धावांवर मर्यादित राहीला.

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमीः २५ षटकात ३ गडी बाद २२८ धावा (सार्थक शिंदे नाबाद १५३ (७६, ११ चौकार, १३ षटकार), शौर्य माणगांवकर नाबाद २८, स्वराज मोरे २-५०);(भागिदारीः चौथ्या गड्यासाठी सार्थक आणि शौर्य २०१ (१२५) पराभूत वि. अजित वाडेकर क्रिकेट अ‍ॅकॅडमीः २४ षटकात ३ गडी बाद २२९ धावा (स्वराज मोरे नाबाद ५४ (४९, ८ चौकार), युवराज मोरे ४५, श्रवण व्हावळ ४९, अलंकार पारवे ३४); सामनावीरः स्वराज मोरे;

ब्रिलीयन्टस् स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमीः २० षटकात २ गडी बाद १९७ धावा (शौर्य जाधव नाबाद ५२ (४४, ७ चौकार), आर्य कुमावत नाबाद ४७ (२१, ९ चौकार), रितम सेन ३७) वि.वि. धीरज जाधव क्रिकेट अ‍ॅकॅडमीः १९.१ षटकात ९ गडी बाद ७२ धावा (कोविद पराशर २४, आर्य कुमावत २-१४, अर्णव खिरीड २-१२, ओजस कदादी २-९); सामनावीरः आर्य कुमावत;

Leave a Reply

%d bloggers like this: