fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsMAHARASHTRA

समाजकल्याण वसतिगृहातील विविध समस्यांविरोधात विद्यार्थ्यांचे जोरदार आंदोलन

प्रलंबित निर्वाह भत्ता,वसतिगृहातील निकृष्ट भोजन,स्वच्छता, अशुद्ध पिण्याचे पाणी,अभ्यासिका आदि प्रश्नांवर विद्यार्थ्यांचा हल्लाबोल

छत्रपती सांभाजीनगर :  सामाजिक न्याय विभागाच्या किलेअर्क स्थित 1000 मागासवर्गीय मुलाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी वसतिगृहातील विविध समस्या,प्रलंबित निर्वाह भत्ता आदि बाबत वसतिगृहाच्या प्रवेशद्वारावर सकाळी ९ वाजेपासून दुपारी २ पर्यँत तीव्र आंदोलन केले.
सामाजिक न्याय विभागाचे सहा. आयुक्त वाबळे यांच्या सोबत रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे सचिन निकम यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने चर्चा करून सोमवार पर्यंत समस्या सोडवा अथवा विद्यार्थी रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा इशारा प्रशासनास देण्यात आला .

समाजकल्याण वसतिगृहातील भोजनाचा निकृष्ट दर्जा,अशुद्ध पाणी पुरवठा, भोजन ठेकेदाराकडून होणारी दडपशाही, वसतिगृहातील अस्वच्छता-डागडुजी,नादुरुस्त विद्युत व्यवस्था,मोडकळीस आलेले महात्मा फुले रंगमंचाची दुरुस्ती, मागील दोन वर्षांपासून प्रलंबित असलेली निर्वाहभत्त्याची रक्कम तात्काळ वर्ग करावी, वसतिगृहात डिजिटल अभ्यासिका सुरू करावी, वसतिगृहातील विद्यार्थी संख्या पूर्ण क्षमतेने भरण्यात यावी-जागा रिक्त ठेवू नये अश्या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.

विद्यार्थ्यांवर दडपशाही करणाऱ्या भोजन ठेकेदाराला ब्लॅक लिस्ट करा,वसतिगृहातील समस्या तात्काळ सोडवा,संगणक लॅब सुरू करा,अश्या मागण्याही या प्रसंगी करण्यात आल्या.

यावेळी रिपब्लिकन विद्यार्थी सेना,पँथर्स रिपब्लिकन विद्यार्थी आघाडी या विद्यार्थी संघटनांनी आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदविला तर रोहन वाकळे, किरण गायकवाड, निलेश वाघमारे,शुभम नेतने, संघर्ष गायकवाड, राहुल कदम, प्रथमेश सरवदे, अश्वजित गवई, निशांत खंदारे, श्याम साळवे, हर्षवर्धन घनसावध, नयन पवार, जितेंद्र चव्हाण, आदित्य दिवेकर, अक्षय भाग्यवंत, अविनाश तारु, अतुल पवार, देवेंद्र वाघ, गौतम वानखेडे, कुणाल चतसे, सुनील संगे आकाश वाढवे, नागेश घोंगडे, सूरज घोंगडे, नवनाथ गडदे, पराग भास्कर, रविकांत मनोहरे, संचित सरवदे, संदिप चाटसे, शिवम तायडे आदींसह शेकडो विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading