‘कर्नाटक’च्या विजयश्री’ ने राहुल गांधींचे नेतृत्वावर शिक्का मोर्तब..! काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी
पुणे : देशांतील वाढती महागाई, बेरोजगारी, धार्मिक व जातीय उन्माद, वाढती द्वेष भावना व सत्ताधिशांच्या ठायी भ्रष्टाचारास मिळत असलेली प्रतिष्ठा, संविधानिक मुल्यांची जोपासना व लोकशाहीची होत असलेली गळचेपी यांचे प्रती निश्चित लक्ष्य’ ठरवून व व्यापक भुमिकेतुन, काँग्रेस नेते राहुलजी गांधी यांनी ‘काश्मिर ते कन्याकुमारी या ३५०० किमी च्या पायी भारत जोडो यात्रेचे’ फलीत कर्नाटक मघील मोठ्या विजयात दडले आहे. या पदयात्रेत काँग्रेस नेते मा राहुल गांधींचे कठोर श्रम व तपस्येचेच हे फलीत आहे.. असे प्रतिपादन काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी कर्नाटक विजया वरील प्रतिक्रियापर निवेदनात केले..
पक्ष संधटनेची सुत्रे जेष्ठ नेते मा मल्विकार्जुन खर्गे यांचे कडे आली असतांना, पक्षाध्यक्षांचा योग्य सन्मान व आदर करीत, पक्षाध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्षास धाडसी, निर्णायक व प्रगल्भ नेतृत्व देण्याचे महतपुर्ण कार्य राहुलजी गांधी यांनी केले व त्याचे फलित हे कर्नाटक निवडणुकीतुन काँग्रेस कात टाकत असल्याचे सिध्द झाले आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधींनी देशहितासाठी सतत घेतलेल्या संघर्षशील भुमिकेस देशातील जनता पाठींबा देत असुन कर्नाटक मधील सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना त्यांनी दिलेले प्राधान्य, कर्नाटकातील जनतेस देण्यात आलेले गँरेंटी कार्ड (हमी पत्र), जेष्ठ नेते सिध्दरामैय्या, डी के शिवकुमार यांचे सह कर्नाटक मधील सर्वच जेष्ठ ते कनिष्ठ नेत्यांमध्ये घालण्यात आलेला मेळ व प्रचारातील सुसुत्रता हीच कर्नाटक च्या विजयश्री’ ची कळसुत्री ठरली असुन काँग्रेस नेते मा राहुल गांधींचे नेतृत्व काळाच्या कसोटीस खरे उतरले असुन कर्नाटक विजय ही २०२४ च्या विजयाची ही नांदी आहे. असे काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी म्हंटले..!
कर्नाटकच्या जनतेचे त्रिवार अभिनंदन करत आदरणीय युपी अध्यक्षा श्रीमती सोनिया जी गांधी, पक्षाध्यक्ष श्री खर्गेजी, मा प्रियांका गांधी सह, सर्व पदाधिकारी आणि कर्नाटका तील कॉंग्रेस नेते व कार्यकर्ते यांचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस मनपुर्वक अभिनंदन करत असल्याचे प्रतिपादन राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केले.
