Saturday, June 6, 2026
Latest NewsPUNE

मंडई परिसरातील मेट्रोचे काम त्वरीत संपवावे अखिल मंडई मंडळातर्फे गणेशोत्सव कार्यकर्त्यांचे निवेदन

पुणे : गणेशोत्सवाची शान असलेल्या विसर्जन मिरवणुकीची सुरूवात मंडई येथील लोकमान्य टिळक पुतळ्यापासून केली जाते. गणेशोत्सव काही महिन्यांवर येऊन ठेपला असला तरी देखील मंडई येथील टिळक पुतळा ते बाबूगेनू चौक तसेच मंडई परिसरातील मेट्रोची कामे थांबली आहेत. ही थांबलेली कामे त्वरीत सुरू होऊन वेळेत संपणे अत्यंत आवश्यक आहे असल्याचे सांगत अखिल मंडई मंडळातर्फे गणेशोत्सव कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडला निवेदन दिले आहे.

अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांनी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड चे संचालक अतुल गाडगीळ यांना निवेदन दिले. लोकमान्य टिळक पुतळ्यापासून लक्ष्मी रस्त्याकडे मानाच्या पाच गणपतींची तसेच भाऊ रंगारी व अखिल मंडई मंडळ यांची विसर्जन मिरवणूक सुरू होते. गणेशोत्सावाचा महत्त्वाचा भाग असलेल्या गणेश विर्सजनाच्या मिरवणूका विनासायस सुरू होण्याकरिता या परिसरातील थांबलेले काम त्वरीत सुरू होऊन वेळेत संपणे अत्यंत आवश्यक आहे.

अण्णा थोरात म्हणाले, गणेशोत्सव ४ महिन्यांवर आला आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे मंडई येथील टिळक पुतळा ते बाबूगेनू चौक येथे भुयारी मार्गाचे काम तसेच मंडई परिसरातील इतर मेट्रोची कामे थांबली आहेत, असे निदर्शनास आले. त्यामुळे येथील काम त्वरित सुरु करून लवकर संपवावे, अशी आम्हा गणेशोत्सव कार्यकर्त्यांची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading