Saturday, June 6, 2026
Latest NewsPUNE

चंदननगर परिसरामध्ये मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय

पुणे : चंदननगर परिसरामध्ये मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय मालकासह व्यवस्थापकावर गुन्हा दाखळ केला असून, महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने ही कारवाई केली. याप्रकरणी चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. चंदननगरमधील डेला थाई मसाज पार्लरमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कारवाई करून महिलेला ताब्यात घेतले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव, सहायक निरीक्षक अश्विनी पाटील, अनिकेत पोटे, अजय राणे, इरफान पठाण, मनीषा पुकाळे, रेश्मा कंक, ओंकार कुंभार यांच्या पथकाने ही दमदार कामगिरी केली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading