fbpx
Thursday, April 25, 2024
BusinessLatest News

क्रिश-ई तर्फे महाराष्ट्रात शेती उपकरणांसाठी IoT आधारित स्मार्ट किट सादर

पुणे : महिंद्राचा AgTech व्यवसाय क्रिश-ई ने पुणे क्रिश-ई स्मार्ट किट (KSK)सादर केले. एक आफ्टर-मार्केट उपकरण, क्रिश-ई स्मार्ट किट हे अशा प्रकारचे पहिले स्मार्ट उपकरण आहे जे जीपीएस सक्षम टाइम ट्रॅकिंग आणि स्मार्ट फोनच्या आरामदायी उपयोगातून विविध घटकांचे दूरस्थ निरीक्षणाद्वारे उपकरण मालकांना त्यांच्या ट्रॅक्टर आणि शेती उपकरणांची तपशीलवार माहिती देते.

क्रिश-ई स्मार्ट किट
 

·         स्मार्ट फोन किंवा डेस्कटॉपद्वारे ट्रॅक्टर, हार्वेस्टर आणि राईस ट्रान्सप्लान्टर्सच्या सर्व ब्रँडचे सुलभ ट्रॅकिंग

·         अचूक क्षेत्रफळ मोजणीसह ऑपरेटरचा  महसूल वाढविते.

·         इंधन चोरीसाठीचा इशारा देत इंधन पातळी निरीक्षण करून इंधन खर्च कमी करणे

·         एकूण फ्लीट खर्चाचा मागोवा ठेवते आणि फ्लीट कमी करते

·         जिओफेन्सिंग अलर्टद्वारे उपकरणांची सुरक्षा वाढवते

·         प्रगत ट्रिप रीप्ले वैशिष्ट्ये सादर करते

·         ४,९९५ रुपयांच्या किमतीवर रिटेलिंग

 

एक अत्याधुनिक सादरीकरण असलेले क्रिश-ई स्मार्ट किट कार्नोट टेक्नॉलॉजीजने विकसित केले आहे. हा एक Ag-Tech स्टार्ट-अप असून त्याची स्थापना २०१५ मध्ये आयआयटी मुंबईच्या चार माजी विद्यार्थ्यांनी त्यांच्या पंचविशीत केली होती. ते IITB रेसिंग संघाचा भाग होते. शर्यतीतील वाहनांच्या कामगिरीवर लक्ष ठेवण्यासाठीच्या उपाय सुविधा त्यांनी विकसीत केल्या होत्या. आज कार्नोट टेक्नॉलॉजीज एम अँड एम लिमिटेड सोबत कंपनीमध्ये महत्त्वपूर्ण भागीदारी मिळवून वाहने आणि उपकरणांच्या कामगिरीचे परीक्षण करण्यासाठी इंटरनेट-कनेक्टेड डिव्हाइसेसशी संबंधित उत्पादने आणि सेवांच्या उत्पादन आणि किरकोळ विक्रीमध्ये गुंतलेली आहे.

क्रिश-ई स्मार्ट किट हे उपकरण मालकांना आणि भाड्याने देणाऱ्या उद्योजकांना ट्रॅक्टरचा डाउनटाइम कमी करताना आणि त्यांच्या ट्रॅक्टर्सचा अनधिकृत वापर रोखणे यासाठी फ्लीट कामगिरी सुधारण्यास, उत्पन्न सुधारण्यास आणि देखभाल खर्चाचे व्यवस्थापन करण्यास सक्षम करते. स्मार्ट किटमध्ये व्यावसायिक वाहतूक आणि ट्रॉली क्रिया ट्रॅक करण्यासाठी प्रगत ट्रिप रिप्ले वैशिष्ट्य देखील समाविष्ट आहे.

हे किट हार्वेस्टर, राईस ट्रान्सप्लान्टर्स आणि सेल्फ प्रोपेल्ड स्प्रेयर्स सारख्या कोणत्याही नवीन किंवा जुन्या ब्रँडच्या ट्रॅक्टर किंवा शेती उपकरणांवर बसविता येऊ शकते. किट क्रिश-ई रेंटल पार्टनर अॅप नावाच्या अॅपसह जोडलेले आहे आणि ते Google Play Store वर उपलब्ध आहे. ट्रॅकिंग आणि मॉनिटरिंगच्या जोडीला, अॅप वापरकर्त्यांना प्रति वापराच्या आधारावर उच्च दर्जाच्या शेती यंत्रांच्या यादीमध्ये अॅक्सेस देखील देते.

एम अँड एम लिमिटेडच्या क्रिश-ई फार्म इक्विपमेंट सेक्टरचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि प्रमुख रमेश रामचंद्रन म्हणाले, “उद्योगातील प्रथम आफ्टरमार्केट loT सोल्यूशन क्रिश-ई स्मार्ट किट शेतकरी आणि व्यवसायांना जोडण्यासाठी आणि त्यांच्या शेती उपकरणांचे निरीक्षण, देखरेख करण्यासाठीचा सर्वात स्मार्ट, सर्वात स्वस्त आणि शाश्वत मार्ग सादर करते. त्याच्या स्केल-अप टप्प्यात, २५,००० हून अधिक सक्रिय वापरकर्त्यांसह आम्ही अधिकृतपणे महाराष्ट्च्या बाजारपेठांमध्ये क्रिश-ई स्मार्ट किट सादर करू.  आम्ही भाड्याने घेतलेल्या कामासाठीच्या प्रत्येक एकर आणि किलोमीटरचे डिजिटायझेशन करण्याचा आमचा उद्देश असल्यामुळे शेतकऱ्यांशिवाय आम्ही राज्यातील संस्था, एफपीओ, सरकारी संस्था आणि स्टार्टअप्सना या एकत्र प्रवासात आमंत्रित करतो. पुढे जाऊन आम्ही भारतातील शेती उपकरणांसाठी कनेक्टिव्हिटीचा अग्रगण्य पुरवठादार बनण्याचे ध्येय ठेवतो.”

कार्नोट टेक्नॉलॉजीजचे सीटीओ पुष्कर लिमये म्हणाले, “भारतात जागतिक दर्जाची उत्पादने तयार करण्याच्या दृष्टीकोनातून आम्ही ट्रॅक्टरसाठी स्मार्टफोन्सवर रीअल-टाइम अपडेट्ससह loT वापरून ट्रॅक्टरची उत्पादकता सुधारण्यात मदत करण्यासाठी लहान प्लग-अँड-प्ले डिव्हाइस सादर केले आहे. आणि आज आम्हाला २५,००० हून अधिक किट आधीपासूनच शेतकर्‍यांना त्यांचा व्यवसाय डिजिटायझ करण्यात मदत करताना बघून आणि प्रत्यक्षात वास्तविक मूल्य भर घालताना बघून आनंद होत आहे. आज महिंद्रासोबत क्रिश-ई स्मार्ट किटच्या अधिकृत सादरीकरणासह आम्ही ट्रॅक्टर मालक आणि भाडे व्यवसाय मालकांच्या मोठ्या संख्येपर्यंत पोहोचताना भारतीय शेतीला येथील उपाय सुविधा आधारांवर डिजीटल करण्याचे उद्दिष्ट ठेवत आहोत.

आतापर्यंत क्रिश-ई चे २५,००० पेक्षा जास्त सक्रिय सदस्य असून ८५% DAU (दैनंदिन सक्रिय वापरकर्ते), अॅपवर (सीझनमध्ये) दररोज सुमारे ५५ मिनिटे खर्च करतात. त्यात विनामूल्य सदस्यता कालावधी संपल्यानंतर ७०% पुनर्सदस्यता आहे.

वैयक्तिक शेतकरी, संस्थात्मक खरेदीदार, एफपीओ आणि स्टार्ट-अप्स क्रिश-ई स्मार्ट किट जवळच्या क्रिश -ई केंद्र, क्रिश -ई वेबसाइट किंवा क्रिश-ई सहाय्यक यांच्याकडून 1800-266-1555 वर कॉल करून ४,९९५ रुपयांना खरेदी करू शकतात (वर नमूद केलेल्या सेवांसाठी कर आणि सहा महिन्यांच्या सदस्यता पॅकेजसह).

२०२० मध्ये सादर करण्यात आलेला क्रिश-ई हा महिंद्राचा एक नवीन व्यवसाय आहे. क्रिश-ई तंत्रज्ञानावर आधारित सेवा देते. त्यामुळे शेतकरी आणि इतर मूल्य साखळी घटकांची उत्पन्न क्षमता शाश्वत पद्धतीने टिकून राहते. ‘एक्सपर्ट तकनीक. नये उपाय. परिणाम दिखाये’ या टॅग लाईन सह क्रिश-ई सेवा सध्या ओम्नी चॅनल मार्फत कृषी सल्लागार, उपकरणे भाड्याने देणे आणि वापरलेली उपकरणे या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतात. त्यात १५० क्रिश-ई केंद्रे आणि अॅप-आधारित टच पॉइंट्स समाविष्ट आहेत.

जागतिक आर्थिक मंचाच्या (WEF) जानेवारी २०२३ च्या श्वेतपत्रिकेत महत्वाच्या नैसर्गिक स्रोतांची शाश्वतता सुनिश्चित करण्यासाठी व्यवसाय समुदायांसोबत कसे सहयोग करू शकतात याचे उदाहरण म्हणून “हवामान बदलाशी जुळवून घेण्याबाबत व्यवसाय कृतीना चालना देताना” याबाबत क्रिश-ई प्रयत्नांची ओळख आणि समावेश श्वेतपत्रिकेत करण्यात आला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading