महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर उद्या निकाल
मुंबई : सध्याचे विद्यमान मुख्यमंत्री व शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली अन् महाविकास आघाडीचे सरकार कोसळे. तेव्हा ज्या 16 विधानपरिषद आमदारांनी बंडखोरी केली त्या आमदारांच्या पात्रते संदर्भातील प्रकरणावर उद्या 11 मे रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या निकालाचा महाराष्ट्राच्या राजकारणावर मोठा परिणाम होणार असून त्यावरून शिंदे – फडणवीस सरकारचे भवितव्य ठरणार आहे.
सर्वोच्च न्यायालयात पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठसमोर महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावरील जवळपास नऊ याचिकेंवर गेल्या 11 महिन्यांपासून सुनावणी सुरू होती. यामध्ये सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती एमआर शाह, कृष्णा मुरारी, हिमा कोहली आणि पी एस नरसिम्हा या पाच न्यायाधीशांचा समावेश आहे. या पाच न्यायाधीशां पैकी एक न्यायाधीश 14 मे ला निवृत्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावरील निकाल कधी लागणार? या बाबत उत्सुकता होती. अखेर आज सर्वोच्च न्यायालयाने उद्याच्या सुनावणीची यादी जाहीर केली. त्यात महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावरील प्रकरणाचा समावेश आहे. यामुळे अवघ्या 24 तासात या याचिकेच्या सुनावणीवरील निकाल येणे अपेक्षित आहे.
