नितीन कुकरेजा अॅलेन करियर इंस्टीट्यूटचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी
भारतातील एक अग्रगण्य शिक्षण कंपनी अॅलेन करियर इंस्टीट्यूट प्रायव्हेट लिमिटेडने (“अॅलेन करियर इंस्टीट्यूट” किंवा “अॅलेन”) नितीन कुकरेजा यांची नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे. नितीन कुकरेजा यांच्याकडे भविष्यातील एक जागतिक दर्जाची शैक्षणिक कंपनी तयार करण्याचे आणि भारतातील शैक्षणिक तुट भरून काढण्याचे कार्य सोपविले आहे. नितीन आणि त्यांची टीम अॅलेनच्या खोलवर रुजलेल्या शैक्षणिक उत्कृष्टतेला तंत्रज्ञानाची जोड देऊन ही उद्दिष्ट्ये मोठ्या प्रमाणात पूर्ण करण्यासाठी लक्ष केंद्रित करतील.
या नियुक्तीबाबत भाष्य करतानाअॅलेन करियर इंस्टीट्यूट प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन ब्रजेश माहेश्वरी म्हणाले, “नितीन कुकरेजा हे अॅलेनसोबत बोर्डचे सदस्य म्हणून आधीपासून जुडलेले आहेत आणि त्यांनी अॅलेनचा धोरणात्मक रोडमॅप परिभाषित करण्यात अमूल्य असे योगदान दिलेले आहे. आता आमचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांचे स्वागत आणि समर्थन करण्यास आम्ही उत्सुक आहोत. कुकरेजा हे असाधारण धोरणात्मक क्षमता आणि व्यवसाय वाढविण्याचा मजबूत अनुभव असलेले मूल्यांना जपणारे असे लीडर आहेत. विद्यार्थ्यांना परिणाम देणारे शिक्षण देण्यासाठी ते ‘टेक्नॉलजी (तंत्रज्ञान) आणि टिचिंग (शिकवणे) हे दोन ‘टी’ एकत्र करतील. या क्षेत्रातील आद्यप्रवर्तक असल्याच्या अॅलेनच्या स्थानाची पूर्ण क्षमता आणि अॅलेनचा ३५ वर्षांचा वारसा लक्षात घेऊन त्याचा पूर्ण उपयोग करून घेण्यात नितीन यांना मदत करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”
नितीन कुकरेजा यांच्या नेतृत्वाखाली अॅलेन करियर इंस्टीट्यूट मोठ्या प्रमाणावर डिजिटल-प्रथम ग्राहक अनुभव देण्यावर लक्ष केंद्रित करेल आणि अॅलेनची व्याप्ती सध्याच्या ३ लाख विद्यार्थ्यांपासून ते २.५ कोटी विद्यार्थ्यांपर्यंत वाढवेल. बोधी ट्रीसोबत धोरणात्मक भागीदारीची एप्रिल २०२२ मध्ये घोषणा केल्या पासून अॅलेनने मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांमधील कौशल्य व प्रतिभेसह आपली अनोखी अशी शैक्षणिक टीम वाढवली आहे. या वर्षाच्या अखेरीपर्यंत अॅलेनची आपली बंगळूरमधील डिजिटल टीम २०० पर्यंत वाढवण्याची योजना आहे.
नितीन कुकरेजा याबाबत बोलताना म्हणाले, “अॅलेनच्या या नवीन परिवर्तनीय प्रवासाचे नेतृत्व करण्यासाठी मी उत्सुक आणि खूप रोमांचित आहे. शिक्षणाचा विद्यार्थ्यांच्या जीवनावर फार प्रभाव पडतो आणि शिक्षण राष्ट्र उभारणीत महत्वाचे योगदान देते. गेल्या ३५ वर्षांत २८ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत हा प्रभाव पोहोचवण्याचा वारसा अॅलेनकडे आहे. माझा ठाम विश्वास आहे की, अॅलेनच्या सकारात्मक प्रभावाला तंत्रज्ञान हे अनेक पटींनी वाढवू शकते. मी भविष्यासाठी सज्ज असलेले अॅलेन तयार करण्यास आणि कोट्यवधी विद्यार्थ्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्यास उत्सुक आहे. माला विश्वास आहे की, बोर्डाची दृष्टी, अॅलेनचा ब्रॅंड आणि आमची मजबूत टीम आम्हाला या प्रवासात प्रचंड मदत करेल.”
