Saturday, June 6, 2026
ENTERTAINMENTLatest News

अखेर अर्जुनचा भ्रष्टाचार होणार अप्पीसमोर उघड

अप्पी आमची कलेक्टर ह्या अतिशय लोकप्रिय मालिकेने, लोकांना आपलंसं केलं. आता पर्यंतच्या भागात आपण पहिले कि अनेक संकटांना तोंड देत अप्पी कलेक्टर झाली. आता खऱ्या अर्थाने तिच्या समोर आव्हाने उभी राहणार आहेत. त्या मुळे ह्या मालिकेला रंजक वळण मिळालं आहे. सध्याच्या व्हायरल प्रोमो मध्ये प्रेक्षकांनी बघितलंच असेल कि अप्पीने कलेक्टरचा पदभार स्वीकारल्यानंतर  सर्वात आधी भ्रष्टचारलिप्त अधिकाऱ्यांच्या   फाईल्स मागवते. त्यामुळे आता अर्जुनाचे भ्रष्टचाराचे पितळ उघडे पडलेले आपल्याला दिसणार आहे.  पोलीस खात्यात रुजू झालेला अर्जुनने भ्रष्टचाराशी हाथ मिळवणी केली आहे. अनेक वेळा तो अप्पीच्या निदर्शनास येता येता राहिला आहे. पण आता मात्र अर्जुनाची सुटका होणार नाही. आता प्रेक्षकांना नक्कीच प्रश्न पडले असतील कि खरोखर अर्जुनच सत्य अप्पी समोर येणार का व त्या दोघांच्या नात्यावर ह्या गोष्टीचा काही परिणाम होणार ? हे पाहायला विसरू नका  ‘अप्पी आमची कलेक्टर’ ह्या मालिकांचा एका तासाचा विशेष भाग ह्या रविवारी १:00 वाजता व संध्यकाळी ७:००  वाजता फक्त आपल्या झी मराठी वर.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading