Saturday, June 6, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

इलेक्ट्रॉनिकसच्या दुकानात मोठा स्फोट; एटीएस कडून तपास सुरू 

पुणे : पुणे शहरातील सहकारनगर भागात एका इलेक्ट्रॉनिकसच्या दुकानात शनिवारी रात्री स्फोट झाला. आता या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. यावरून हा स्फोट फक्त इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा नसून स्फोटकांचा असावा असा पोलिसांचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांसह एटीएस कडूनही या घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, शनिवारी रात्री (29 एप्रिल) उशिरा पुणे येथील स्वारगेट – कात्रज रोडवर सहकारनगर भागातील एका इलेक्ट्रॉनिकसच्या दुकानात मोठा स्फोट झाला. या घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. आता चार दिवसांनंतर या स्फोटाच्या घटनेची सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. प्रथमदर्शनी पाहता हा स्फोट इतका मोठा होता की केवळ शॉक सक्रीटमुळे किंवा गॅस सिलेंडरमुळे हा स्फोट झाला असावा असे वाटत नाही. यांची दाखल घेत आता या स्फोटाच्या घटनेचा तपास एटीएस कडून सुरू करण्यात आला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading