Thursday, September 3, 2026
Latest NewsPUNE

पीएमपीएमएल कडून डेक्कन – शिवाजीनगर- डेक्कन व डेक्कन – पुणे विद्यापीठ – डेक्कन हे दोन वर्तुळ बस मार्ग सुरु

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून विद्यार्थी, कामगार व प्रवाशांच्या सोयीसाठी उद्या पासून  गुरुवार दि. ०४/०५/२०२३ पासून प्रवाशांच्या वाढत्या मागणी नुसार मार्ग क्रमांक – ९५ डेक्कन – शिवाजीनगर – डेक्कन व मार्ग क्रमांक – ९६ डेक्कन – पुणे विद्यापीठ – डेक्कन हे नवीन वर्तुळ बस मार्ग सुरु करण्यात येणार आहेत. सदर मार्गावरील बसेस पुढील गर्दीच्या वेळेत सुरु राहतील.

अ.क्र मार्ग क्रमांक पासून – पर्यंत मार्गाचा तपशील बसेस सुटण्याच्या वेळा
१. ९५ डेक्कन – शिवाजीनगर- डेक्कन डेक्‍कन जिमखाना, फग्‍युर्सन रोड, मनपा भवन, शिवाजी नगर, डेक्‍कन जिमखाना सकाळी – ०८:००, ०८:४०, ०९:२०, १०:००, १०:४०, ११:२०,

दुपारी – ०४:००, ०४:४०,

सायंकाळी – ०५:२०, ०६:००, ०६:४०, ०७:२०

२. ९६ डेक्कन – पुणे विद्यापीठ – डेक्कन डेक्‍कन जिमखाना, भांडारकर रोड, शेती महामंडळ, पुणे विदयापीठ, ई स्‍केवर, सिमला ऑफिस, डेक्‍कन जिमखाना सकाळी – ०७:३०, ०८:४०, ०९:५०, ११:००

दुपारी – ०४:००,

सायंकाळी – ०५:१०, ०६:२०,

 

सदर बस मार्ग सुरु होत असल्याने यामार्गावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना किफायतशीर दरात सुरक्षित सेवा उपलब्ध होणार आहे, तरी जास्तीत-जास्त प्रवासी नागरिकांनी या बस सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून करण्यात येत आहे. तसेच प्रवासी संख्या व उत्पन्नात वाढ झाल्यास या मार्गांवर आणखी बसेस वाढविण्यात येतील, असेही महामंडळाकडून सांगण्यात आले आहे.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading