fbpx
Saturday, April 27, 2024
Latest NewsPUNETOP NEWS

रहदारीच्या ठिकाणी असलेल्या पंचतारांकित हॉटेलमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

पुणे : पुणे स्टेशन (Pune station)  परिसरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर छापाटाकून पुणे पोलिसांनी एका मोठ्या सेक्स रॅकेटचा (sex racket )पर्दाफाश केला आहे. या कारवाईत चार परप्रांतीय महिलांसह तीन दलालांना अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने हा प्रकार उघडकीस आणून कडक कारवाई केली.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, या कारवाईत दिल्ली, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगालमधील चार तरुणींना ताब्यात घेण्यात आले आहे. तर रवींद्रकुमार तुलशी यादव, आनंदकुमार सुक्कर यादव, अभिषेक प्रकाशचंद बेनिवाल अशी अटक केलेल्या दलालांची नावे आहेत. पोलिसांनी छापा टाकला त्यावेळी दोन तरुणींना ताब्यात घेण्यात आले होते. त्यांची चौकशी केली असता येरवडा भागात आणखी दोन तरुणी आणि तीन दलाल थांबल्याची माहिती मिळाली. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात दलालांच्या विरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलींकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे दलाल सोशल मीडियावरून ग्राहकांशी संपर्क करायचे. व्यवहार देखील ऑनलाईनच केले जायचे. त्यानंतर शहरातील फाईव्ह स्टार हॉटेलमधील रूम बुक करून परराज्यातील तरुणींना तिथे बोलावून वेश्याव्यवसाय केला जात होता.

दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी हडपसर येथील फुरसुंगी रोडवरील हरपळे वस्तीतील ढोरे पेट्रोल पंपासमोरील स्वर्ग लॉजमध्ये वेश्याव्यवसाय सुरू होता. पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करून दोन मुलींची सुटका केली होती. त्यानंतर झालेली ही सलग दिसरी पोलिस कारवाई आहे.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading