Saturday, June 6, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

राज्यात अवकाळी सरकार बसलं आहे – आदित्य ठाकरे

मुंबई : राज्याच्या अनेक भागांत गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मुसळधार पाऊस, गारपीट आणि जोराच्या वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांते नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो आहे. महाविकास आघाडीच्या काळात शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिली. आजही शेतकरी सांगतात, आम्हाला सरकारची मदत मिळाली. परंतु आता अवकाळी सरकार बसलं आहे. त्यांना अवकाळी पावसाची पर्वा नाही. शेतकऱ्यांच्या दुःखांशी त्यांना काहीही देणेघेणे नाही. अशी टीका ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आज केली. 

महावीकस आघाडीच्या वज्रमुठ सभेत आदित्य ठाकरे बोलत होते.  पुढे बोलताना ठाकरे म्हणाले, “राज्यात सध्या अवकाळी सरकार बसले आहे. राज्यात अवकाळी पाऊस झाला तरी, अद्याप शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. शेतकरी मदतीपासून वंचित आहे. मागील सरकारच्या काळात शेतकऱ्यांना जाहीप केलेली सर्व मदत मिळाली. याबाबत मी शेतकऱ्यांशी बातचीत केली असता, त्यांनीही मदत मिळाल्याचे सांगितले”, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले.

आदित्य ठाकरे म्हणाले, गेल्या ९-१० महिन्यात महाराष्ट्र अंधकारात गेला आहे. महाराष्ट्राला पुन्हा एकदा सुवर्णकाळाकडे घेऊन जायचे आहे. महाविकास आघाडीच्या काळात साडे सहा लाख कोटींची गुतवणूक महाराष्ट्रात आणली गेली आहे. सध्याचं सरकार हे बिल्डर आणि कंत्राटदारांचे सरकार आहे. यात एकही मुंबईकर नाही. महिलांबाबत अपशब्द वापरणारे आजही सरकारमध्ये मंत्री म्हणून काम करत आहेत. महाराष्ट्रात मुख्यमंत्री नसल्यासारखा कारभार चालला आहे. हे राज्य अंधकारात गेले आहे. त्याला अंधकारातून बाहेर काढायचे आहे. फॉक्सकॉनसह अनेक उद्योग महाराष्ट्रातून बाहेर गेले. बाहेर म्हणजे गुजरातमध्ये गेले आहेत गुजरातला सध्या दोन मुख्यमंत्री आहेत, एक तिकडचा आणि एक आपल्याकडचा. मुंबईत शिवसेनेची सत्ता आली तेव्हा मुंबई महापालिकेचा तुटीचा अर्थसंकल्प होता. आज त्याच मुंबई महापालिकेकडे ९० हजार कोटींच्या ठेवी आहेत. असेही ठाकरे यांनी सांगितले. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading