fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNE

ज्येष्ठ नृत्य गुरु मनीषा साठेंच्या नृत्यप्रस्तुतीने गाजला ‘अनुवेध’चा नृत्यदिन !

पुणे : आंतरराष्ट्रीय नृत्य दिनाचे औचित्य साधून मनीषा नृत्यालय संस्थेने आयोजित केलेला ‘अनुवेध’ हा कार्यक्रम ज्येष्ठ नृत्य गुरु मनीषा साठे आणि शिष्यांच्या नृत्यप्रस्तुतीने गाजला ! बालगंधर्व रंगमंदिर येथे २९ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता हा कार्यक्रम झाला.

मंजिरी कारूळकर, शांभवी दांडेकर, शिल्पा दातार, पूर्वा शाह, मानसी गदो, पद्मश्री जोशी, तेजस्विनी साठे, डॉ. माधुरी आपटे, गौरी स्वकुळ, मिथिला भिडे, ईशा काथवटे, पायल गोखले, अदिती कुलकर्णी, मधुरा आफळे, वल्लरी आपटे, अदिती लेले यांच्या बहारदार नृत्यसंरचना प्रस्तुत झाल्या. त्यांच्या शिष्याही प्रतिवर्षीप्रमाणे ह्या नृत्यसंध्येत उत्तम तयारीने सहभागी झाल्या होत्या.

ज्येष्ठ नृत्यगुरु मनीषा साठे यांच्या दुर्गा स्तवन आणि लक्ष्मीताल प्रस्तुतीने उपस्थित भारावून गेले. तराणा, सरगम, होरी, चतरंग, ध्रुपद यासारख्या पारंपरिक बंदिशींसह शिवभूषण, नरनारायण कवित्त, मोजार्ट सिम्फनी, सप्तचक्र अशा विषयांच्या कल्पक हाताळणीने रसिक तृप्त झाले. एकाच नृत्यगुरूंच्या १४ शिष्यांनी एकत्र येऊन अशी प्रस्तुती एकदिलाने साकार करण्याचे असे उदाहरण विरळाच!

मनीषा साठे यांनी छोटेखानी मनोगताद्वारे नव्या पिढीला मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, ”माझ्या दृष्टीने सहृदय कलाकारांनी असे एकत्र राहणे, एकमेकांना तत्परतेने मदत करणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. नृत्य तर त्यांनी विचारपूर्वक आणि चांगले केलेच पाहिजे पण एकमेकांबद्दलचे प्रेम आणि विश्वास ही सगळ्यात जमेची बाजू!”

डॉ. माधुरी आपटे यांनी निवेदनाची बाजूही सांभाळली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading