Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

दिव्यांगांनी एकत्र येऊन ऐकली पंतप्रधान नरेंद्र मोदींची शंभरावी मन की बात

पुणे : क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि एनॅबलर चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे आज दिव्यांग बंधू भगिनींसाठी एकत्रित पंतप्रधान नरेंद्र मोदींचा “मन की बात” चा शंभरावा भाग ऐकण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिव्यांगांच्या कल्याणासाठी तत्पर असून त्यांनी एक मन की बात चा भाग हा दिव्यांगांना समर्पित केला होता, म्हणूनच आज दिव्यांग बंधू भगिनींसमवेत शंभरावा भाग ऐकण्याचे नियोजन केले असे क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर म्हणाले.

शंभराव्या भागाचे औचित्य साधून शंभर दिव्यांगांना रोजगारासाठी मदत करणे, व्हीलचेयर भेट देणे, शस्त्रक्रिया करणे,बॅटरी वर चालणारे वाहन उपलब्ध करणे असा संकल्प सोडला असून आज उद्योजक संजीव अरोरा यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दहा दिव्यांगांना व्हीलचेयर भेट देऊन ह्या उपक्रमास प्रारंभ करत असल्याचे संदीप खर्डेकर आणि संयोजिका मंजुश्री खर्डेकर यांनी सांगितले.

” दिव्यांगांच्या प्रतीचे कोणतेही सेवाकार्य हे पुण्याचे काम असून अश्या प्रकारे प्रसिद्धीच्या मागे नं धावता समर्पित वृत्तीने सेवाकार्य करणारे उद्योजक संजीव अरोरा, क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर आणि एनॅबलर चॅरिटेबलं ट्रस्ट चे संस्थापक अमोल शिनगारे यांच्यासारख्यांचे कार्य आदर्शवत असल्याचे ना. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले.” दिव्यांगांना व्हीलचेयर भेट देण्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते. *मी पुण्यातील दिव्यांगांची यादी तयार केली असून येणाऱ्या काळात कोणताही दिव्यांग व्यक्ती हा सक्षम कसा होईल यावर मी लक्ष केंद्रित केले आहे असेही चंद्रकांतदादा पाटील म्हणाले. केंद्र सरकार व राज्य सरकारच्या योजनांचा लाभ तर दिव्यांग बंधू भगिनींना मिळवून देऊच पण पुणे शहरात संजीव अरोरा सारखे उद्योजक, क्रिएटिव्ह फाउंडेशन चे संदीप खर्डेकर व मुकुलमाधव फाउंडेशन चे सचिन कुलकर्णी यासारखी अनेक व्यक्ती काम करत आहेत ज्यांच्या माध्यमातून दिव्यांगांना जे जे लागेल ते ते पुरविण्याचा माझा ही प्रयत्न असल्याचेही चंद्रकांतदादा पाटील म्हणाले.
मन की बात कार्यक्रमादरम्यान दिव्यांग बंधू भगिनींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टाळयांच्या गजरात अभिवादन केले. यावेळी कार्यक्रमाचे संयोजक क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर, शिक्षण समिती अध्यक्ष व माजी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, एनॅब्लर चॅरिटेबल ट्रस्ट चे संस्थापक अमोल शिनगारे व राहुल अवघडे,उद्योजक संजीव अरोरा, मुकुलमाधव फाउंडेशन चे सचिन कुलकर्णी, परशुराम सेवा संघाचे विश्वजित देशपांडे, भाजप आय टी सेल च्या प्रमुख सौ. कल्याणी खर्डेकर, राजू दाभाडे, ऍड. अमोल काजळे पाटील, सतीश कोंडाळकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
संदीप खर्डेकर यांनी सूत्रसंचालन, अमोल शिनगारे यांनी आभार प्रदर्शन तर मंजुश्री खर्डेकर यांनी उपस्थितांचे सत्कार केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading