Friday, June 19, 2026
BusinessLatest News

सोनी आपल्या नवीन झेडव्ही -१ एफ (ZV-1F) या सर्जनशीलता वाढवणाऱ्या व्लॉग कॅमेऱ्यासह व्लॉगिंग लाइनअप वाढवत आहे

नवी दिल्ली : सोनीने आज नवीन व्लॉग कॅमेरा झेडव्ही -१ एफ (ZV-1F) बाजारात आणला. सर्जनशीलता, सुलभ व्लॉगिंग फंक्शन्स, अत्याधुनिक प्रगत कनेक्टिव्हिटी आणि इको फ्रेंडली वैशिष्ठ्ये यांनी भरलेला आणि ज्यांना आकर्षक फोटो आणि व्हिडिओ टिपायचे आहेत अशा व्लॉगर्स आणि कंटेंट निर्मात्यांद्वारे उत्तम परिणामांसाठी सर्रास वापरला जाईल असा (गो-टू) नवीन कॅमेरा आहे. आशयाला (कंटेंट) एकदम खास व वेगळे बनवण्यासाठी या पॉकेटच्या आकाराच्या कॅमेऱ्याला सोनीच्या नवीनतम तंत्रज्ञानासह व्लॉगिंगसाठी सानुकूल करण्यात आले आहे.

सोनी इंडियाच्या डिजिटल इमेजिंग व्यवसाय प्रमुख मुकेश श्रीवास्तव म्हणाले, “झेड व्ही-१ एफ (ZV-1F) हा एक पुढील पिढीच्या कंटेंट निर्मात्यांचा व्लॉगिंग अनुभव वाढवण्यासाठी डिझाईन केलेला कॉम्पॅक्ट कॅमेरा आहे. उच्च गुणवत्तेच्या कंटेंटच्या सतत वाढणाऱ्या मागणीमुळे निर्मात्यांना जो उत्कृष्ट दर्जाचे परिणाम देईल आणि त्याचबरोबर वापरण्यास सोपे देखील असेल आणि खास करून ज्यामधून कंटेंट वायरलेस पद्धतीने सामाईक करता येईल अशी सर्व वैशिष्ठ्ये एकत्रित एका कॅमेऱ्यात मिळतील अश्या (all-in-one) कॅमेऱ्याची गरज आहे, आम्ही झेड व्ही-१ एफ (ZV-1F) मध्ये इको फ्रेंडली वैशिष्ठ्ये देखील समाविष्ट केली आहेत, ज्याचा उद्देश शून्य पर्यावरणीय पाऊलखुणा (झिरो एनवायरमेंटल फूटप्रिंट) साध्य करणे आहे कारण शाश्वतता हे सोनीच्या मुख्य लक्ष्य केंद्रांपैकी एक क्षेत्र आहे.”

हा अल्ट्रा वाइड अॅन्गल  २०एमएम प्राइम लेन्स, ग्रुप सेल्फी आणि पार्श्वभूमीतील निसर्ग सौन्दर्याच्या दृश्यांसाठी आदर्श आहे. यात सेल्फीसाठी वॅरी-अॅन्गल एलसीडी आहे. झेडव्ही -१ एफ (ZV-1F) तुमचे त्वचेचे टोन अचूकपणे टिपतो आणि तुमचा निरोगी व नैसर्गिक लुक सुनिश्चित करतो. उच्च गुणवत्तेच्या सुस्पष्ट फोकसिंगसाठी ४२५ काँट्रास्ट डिटेक्शन एएफ फ्रेम पॉईंट्स देखील यात आहेत. घराबाहेर आवाजाचे स्पष्ट रेकॉर्डिंग करण्यासाठी विंड स्क्रीन आणि उच्च गुणवत्तेच्या आवाजासाठी अंतर्गत दिशात्मक ३-कॅप्स्यूल माइक देखील यामध्ये आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading