Tuesday, September 1, 2026
BusinessLatest News

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्सतर्फे आर्थिक वर्ष  चा व्हीएनबी दुप्पट

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्सने ३१ मार्च २०२३ रोजी संपलेल्या वर्षाअखेर दमदार कामगिरी नोंदवली असून नफ्याचे प्रतिनिधीत्व करणारा व्हॅल्यू ऑफ न्यू बिझनेस (व्हीएबी) आर्थिक वर्ष २०२३ मध्ये वाढून २७.६५ अब्ज रुपयांवर गेला आहे व त्यात वार्षिक पातळीवर २७.८ टक्क्यांची नोंद झाली आहे. व्हीएनबी मार्जिन आर्थिक वर्ष २०२२ मध्ये २८.० टक्क्यांवरून आर्थिक वर्ष २०२३ मध्ये ३२.० टक्क्यांवर गेले आहे. अशाप्रकारे कंपनीने आर्थिक वर्ष २०१९ मधील व्हीएनबी दुप्पट करण्याचे उद्दिष्ट आर्थिक वर्ष २०२३ पर्यंत साध्य केले आहे.

४पी धोरण, दर्जेदार विकास, व्यावसायिक विकासाचे संरक्षण, विमा नूतनीकरणात झालेली प्रगती आणि उत्पादनक्षमता आणि ग्राहकाभिमुखतेला असलेले सर्वाधिक महत्त्व इत्यादी घटकांच्या मदतीने चार वर्षांत कंपनीने व्हीएनबी वाढ साध्य केली. व्यवसाय व्यवस्थापनामध्ये ईएसजीचा असलेला समावेशही त्यासाठी उपयुक्त ठरला.

आर्थिक वर्ष २०२३ मध्ये अन्युलाइज्ड प्रीमियम इक्व्हिव्हॅलंट (एपीई), हे नवीन व्यवसायाचे मोजमाप वार्षिक पातळीवर ११.७ टक्क्यांनी वाढून ८६.४० अब्ज रुपयांवर गेले आहे. त्याशिवाय कंपनीचा व्यवसाय विस्तार, उत्पादन वैशिष्ट्यांचा विस्तार आणि वेगवेगळ्या प्रकारचे उत्पन्न असलेल्या ग्राहकवर्गापर्यंतचा विस्तार अशा विविध घटकांच्या एकत्रीकरणातून कंपनीला वितरणाचे चॅनेल्स आणि उत्पादनांत दमदार वाढ नोंदवणे शक्य झाले. न्यू बिझनेस सम अश्युअर्ड वार्षिक पातळीवर ३४.७ टक्क्यांनी वाढून १०.४ ट्रिलियन रुपयांपर्यंत गेले आहे.

कंपनीने आर्थिक वर्ष २०२२ च्या तुलनेत सर्व विभागांदरम्यान पर्सिस्टन्सीमध्ये लक्षणीय वाढ नोंदवली. १३ व्या महिन्याचे पर्सिस्टन्सी गुणोत्तर आर्थिक वर्ष २०२३ मध्ये ११ महिन्यात ९० बेसिस पॉइंट्सनी वाढून ८६.६ टक्क्यांपर्यंत गेले आहे आणि ६१ व्या महिन्याचे पर्सिस्टन्सी गुणोत्तर आर्थिक वर्ष २०२३ च्या ११ महिन्यांत ११३० बेसिस पॉइंट्सनी वाढून ६५.७ टक्क्यांवर गेले आहे.

डिजिटल तंत्रज्ञानामध्ये सातत्याने होणाऱ्या गुंतवणुकीमुळे कंपनीला भविष्यासाठी सज्ज राहाणे, जास्त उत्पादनक्षमता साध्य करणे, खर्चाच्या बाबतीत किफायतशीर राहाणे आणि अधिक दर्जेदार ग्राहक सेवा देणे शक्य झाले आहे.

व्यवस्थापनाअंतर्गत मालमत्ता ३१ मार्च २०२३ रोजी २५११.९१ अब्ज रुपयांवर गेली असून त्यातून ग्राहकांचा कंपनीवर असलेला विश्वास कळून येतो. आर्थिक वर्ष २०२३ मधील सॉल्व्हन्सी गुणोत्तर २०८.९ टक्के म्हणजेच १५० टक्क्यांच्या नियामक आवश्यकतेपेक्षा जास्त आहे.

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. एन एस कन्नन म्हणाले, ‘एप्रिल २०१९ मध्ये आम्ही आर्थिक वर्ष २०१९ मधील व्हीएनबी चार वर्षांत दुप्पट करण्याची महत्त्वाकांक्षा ठेवली होती. हे उद्दिष्ट २७.६५ अब्ज रुपयांच्या व्हीएनबीचे वितरण करत ३२ टक्क्यांच्या या क्षेत्रातील आघाडीच्या मार्जिनसह यशस्वीपणे पूर्ण केल्याचे जाहीर करताना मला आनंद होत आहे. हा व्हीएनबी दर्जेदार व्यवसायासह साध्य करण्यात आला असून सर्व विभागांदरम्यान उंचावलेले पर्सिस्टन्सी गुणोत्तर पाहून ते लक्षात येते.’

वैविध्यपूर्ण वितरण आणि वैविध्यपूर्ण उत्पादन श्रेणीचा पाठपुरावा करण्याच्या आमच्या धोरणामुळे आर्थिक वर्ष २०२३ च्या चौथ्या तिमाहीत एपीईमध्ये २६.५ टक्के वार्षिक वाढ दिसून आली आहे. संरक्षक आणि अन्युईटी उत्पादनांवर भर दिल्याचे चांगले परिणाम या विभागात झालेल्या विकासात प्रतिबिंबित झाले आहे. आर्थिक वर्ष २०२३ मध्ये मिळालेल्या न्यू बिझनेस प्रीमियममध्ये या उत्पादनांचा अंदाजे अर्धा वाटा आहे.

आम्ही वैविध्यपूर्ण उत्पादने आणि चॅनेल्स, दर्जावर देखरेख करणारे कठोर मापदंड, लक्षणीय जोखीम व भांडवल मेट्रिक्सच्या मदतीने विश्वासार्ह व्यवसाय उभा केला आहे. या जोरावर नजीकच्या भविष्यात विमा क्षेत्रातील संधींचा लाभ घेण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading