Sunday, June 21, 2026
ENTERTAINMENTLatest News

आरतीच्या लग्नाच्या निमत्ताने वेदांत आणि अमुल्या येणार एकत्र !

कुटुंबाच्या भल्यासाठी एकत्र येणार ३६ गुणी जोडी!झी मराठी वरील ‘३६ गुणी जोडी’ या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. अविनाश नारकर, ऋजुता देशमुख, आयुष संजीव आणि अनुष्का सरकटे अशी तगडी स्टारकास्ट या मालिकेत आहे. ह्या मालिकेची टॅग लाईनच आहे ‘प्रत्येक जोडी जुळत नसते’. ह्या मालिकेतील नायक नायिका विरुद्ध दृष्टिकोन असलेल्या दोन व्यक्ती आहेत. वेदांत हा एक सुप्रसिद्ध तरुण, प्रस्थापित उद्योगपती आहे तो स्त्रीपेक्षा पुरुषांच्या सहवासाला प्राधान्य देतो कारण त्याचा असा विश्वास आहे की पुरुष स्त्रीपेक्षा अधिक सक्रिय, कार्यक्षम, तीक्ष्ण आणि मेहनती आहे. तर अमुल्याला डॉक्टर बनण्याची इच्छा असली तरी तिला हिमोफोबिया आहे. ती प्रेमळ, स्वैच्छिक, टॅलेंटेड आणि विनोदी असून ही तिच्या व्यक्तिमत्त्वाची मजबूत बाजू आहे.

ही मालिका आता एका रोमांचक वळणावर आहे. आता पर्यंतच्या भागात आपण पाहिलं की, गौतम प्रभाकर आणि प्रभा ह्या त्याच्या खोट्या आई वडिलांना लग्नाची बोलणी करायला तुम्पल्वारांकडे येतात. यावर अण्णा काहीसे भडकतात, दुसरीकडे वेदान्त, विक्रांत आणि आदया तिघेही आईने स्वतःला कोंडून घेण्यामुळे अस्वस्थ आहेत. लग्नाच्या दिवशी गौतम फ्रॉड असल्याचं वेदांत आरती समोर उघड करतो. मात्र खर्‍या परिस्थितीची कोणालाच कल्पना नसल्याने आरती आपल्या लग्नात मोडता घालत असल्याच्या गैरसमजातून वेदांतच्या थोबाडीत मारते. अमुल्या वेदांत खरं बोलत असल्याचं  आरतीला सांगण्याचा प्रयत्न करते.

आरती वेदांत आणि अमुल्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवेल? सतत एकमेकांशी भांडणारे वेदांत अमुल्या कुटुंबाच्या भल्यासाठी एकत्र येतील? या सर्व प्रश्नांच्या उत्तरासाठी पाहायला  विसरू नका ‘३६ गुणी जोडीचा’ १ तासाचा विशेष भाग २३ एप्रिल रात्री ८ वा. फक्त आपल्या झी मराठीवर.

 

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading