पुलवामा हल्ल्यात वापरण्यात आलेली स्फोटकं नागपूरमधील – नाना पटोले यांचा गौप्यस्फोट
नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बालेकिल्ला असलेल्या नागपुरातून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर हल्ला चढवला. मुख्यमंत्र्यांकडून राज्यात काॅमेडी शो सुरु असल्याची टीका नाना पटोले यांनी केली. पुलवामा हल्ल्यातील स्फोटकं नागपूरमधून गेलेत, त्याच्या सीबीआय चौकशीचं काय झालं? असा सवाल त्यांनी केला . तसेच त्यांनी शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नयेत, असे आवाहन शेतकऱ्यांना केले. ते पुढे म्हणाले की, राज्यात अवकाळीने नुकसान झालं आहे आणि राज्यात मुख्यमंत्र्यांचा काॅमेडी शो सुरु आहे, त्यांना काही देणघेणं नसल्याचे ते म्हणाले. आम्ही सत्तेत असताना भरीव मदत केली. एका पैशाची मदत नसल्याचे ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. जाहिरातीवर 1 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे, एकंदरीत भयंकर परिस्थिती असल्याचे ते म्हणाले.
नाना पटोले यांनी, संभाजीनगरमधील दोन गटांच्या वादात पोलिसांकडून मुद्दाम दुर्लक्ष झाल्याचा आरोप त्यांनी केला. ते म्हणाले की, नागपुरातील सभेच्या जागेचा वाद निर्माण करण्यात आला. भाजप का घाबरतं? अशी विचारणा त्यांनी केली. देशातील महागडे शहर नागपूर असल्याचे ते म्हणाले. जे काही आणलं आहे ते सगळं कर्जातून आणलं आहे. जनतेच्या खिशातून पैसे लुटले जात आहेत. नागपूरकरांना लुटलं जातं आहे. पिण्याचे पाणी दिलं जात नाही. नागपुरात भयावह परिस्थिती असल्याचे ते म्हणाले. एक प्रकारे लुटण्याचे काम सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बोलताना अदानी मुद्दा उपस्थित करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. पंतप्रधानांवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याचे त्यानी सांगितले. ते कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देत नाहीत. विस्फोटक बातम्या येत आहेत, अदानी समूहाकडून सांगूनही हिंडेनबर्गवर मानहानीचा दावा ठोकला नसल्याचे ते म्हणाले.
