समर क्वीन, किंग, प्रिन्स, प्रिन्सेस सौंदर्य स्पर्धा उत्साहात
द डार्क शॅडो मोशन पिक्चर्स निर्मित आणि दिग्दर्शक रामकुमार शेडगे यांनी आयोजित केलेल्या समर क्वीन, किंग अँड प्रिन्सेस ही स्पर्धा मोठ्या दिमाखात पार पडली. याप्रसंगी अभिनेते विजय पाटकर, स्मिता गोंदकर, स्वाती कार्नेकर, संकेत मोरे असे अनेक दिग्गज कलाकारांनी या सोहळ्याला हजेरी लावली होती. पुण्याबरोबरच महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता.
या स्पर्धेत प्रिया शिंदे, आरती मोरे, साक्षी भोईनाल्लू, शिवानी नढे यांनी क्वीन स्पर्धेत बाजी मारली तर किंगमध्ये रोशन परदेशी, हर्ष ठाकूर, सूरज होनकळस हे विजेते ठरले. प्रिन्समध्ये गिरीराज भालेराव, स्वत्विक सावरकर, कुलस्वराज जंगम तर प्रिन्सेसमध्ये अवंतिका गायकवाड, कृष्णाली चितोड, अज्ञा वरे, सुभद्रा लांडगे हे स्पर्धक विजेते ठरले. मुकुट, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, नक्षत्रची पैठणी असे विजेत्यांना देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
चार वर्षाच्या चिमुरड्यासह ५० वर्षाच्या स्पर्धकांनी आत्मविश्वासाने ओतप्रोत भरून आलेल्या अनेक युवतींनी
समर क्वीन प्रिन्स अँड प्रिन्सेस’च्या सौंदर्य स्पर्धेत आपला जलवा दाखवला. विनोदी अभिनेते विजय पाटकर यांनी देखील आपल्या खुमासदार अभिनयाने आणि अदाकारीने या स्पर्धेला चार चाँद लावले. त्यांनी स्वतः ही धमाल उडवून दिली. या स्पर्धेमध्ये परीक्षक म्हणून गुरमीत कौर, डॉ. अंजली आवटे, अभिनेता राहुल बोराटे यांनी काम पाहिले.
उद्योजक राहुल भंडारी, नक्षत्रचे अनुराधा गणेश तुम्मा, एस. फोर. जी हॉटेलचे संदीप कुंजीर, शिवाजी जावळे, ग्रूमिंग विनोद टेमगिरे, हेअर मेकअप पूजा काठमवार, श्रद्धा दराडे, सुप्रिया देशपांडे, क्लॉथ डिझाईनर सोमय्या पठाण, पोस्टर सुजय दंताळे, आकाश जाधव, नइम पठाण व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश सोनी यांनी केले.
