Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

‘महाराष्ट्र रत्न पुरस्कार’ डॉ जोहरभाई चुनावला यांना प्रदान

पुणे : महाराष्ट्र सोसायटीज् वेल्फेअर असोसिएशन आणि रेड अॅन्ट यांच्या वतीने महाराष्ट्र रत्न पुरस्कार २०२३ पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक डॉ. जोहरभाई चुनावाला यांना मनिंदरजीत सिंग बिट्टा यांच्या हस्ते नुकताच बहाल करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, मेडेल, डॉक्टरेट पदवी देण्यात आली. संपूर्ण भारतातून या पुरस्कारासाठी पुरस्कार्थी होते मात्र पुण्याचे उद्योजक जोहरभाई यांनी या पुरस्कार मोहोर उमठवली आहे. सर्व स्थरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

या प्रसंगी डॉ. जोहरभाई म्हणाले की महाराष्ट्र सोसायटीज् वेल्फेअर असोसिएशन आणि रेड अॅन्ट यांच्या वतीने महाराष्ट्र रत्न पुरस्काराने मला सन्मानित करण्यात आले. याच्याबद्दल मी दोन्ही संस्थेचा आभारी आहे. मी अनेक वर्ष उद्योग क्षेत्रात कार्यरत आहे. या पुरस्कारा मला व आमच्या कामगार वर्गाला प्रेरणा देणारा असून अनेक रिकाम्या हातांना काम देण्यासाठी हा पुरस्कार मला नवी उर्जा देईल. एक पुणेकर या नात्याने भविष्यात बेरोजगार तरुणांना रोजगारीची मी संधी उपलब्द करून देण्यासाठी माझे विशेष पर्यत असतील.

हा पुरस्कार मिळालेले जोहरभाई एकमेव पुणेकर आहेत. पुण्याच्या व पुणेकरांच्या मानाच्या शिरपेचात तुरा खोवणारा हा पुरस्कार आहे. या पुरस्काराने अनेक नवीन उद्योजकांना प्रेरणा मिळाल्याशिवाय राहणार नाही. सदरील कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading