फर्ग्युसन महाविद्यालयात रा.ना.दांडेकर संस्कृत एकांकीका स्पर्धा संपन्न
पुणे : फर्ग्युसन महाविद्यालयाच्या अंफिथिएटर मध्ये संस्कृत विभागातर्फे डॉ. रा.ना.दांडेकर संस्कृत एकांकीका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या २२ वर्षांहून अधिक काळापासून ही स्पर्धा आयोजित केली जाते. प्रसिद्ध संस्कृत विद्वान डॉ. रा.ना.दांडेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित या स्पर्धेमध्ये , फर्ग्युसन महाविद्यालय,एस.पी.महाविद्यालय,डेक्कन महाविद्यालय,टिळक महाराष्ट्र विद्यापीठ,सावित्रिबाई फुले पुणे विद्यापीठ , हं.प्रा. ठा. महाविद्यालय.अमेरिकन इन्स्टिट्युट इत्यादि महाविद्यालयांनी आपला सहभाग नोंदवला.
फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राध्यापक डाॕ.रविंद्रसिंह परदेशी यांच्या हस्ते सकाळी उद्घाटन झाले. परीक्षक मान्यवर डॉ. गौरी मोघे , अमोघ प्रभुदेसाई, तन्मय भोळे यांचेही स्वागत करण्यात आले. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष श्री महेश आठवले सुद्धा यावेळी उपस्थित होते.
या स्पर्धेसाठी भांडारकर प्राच्यविद्या संशोधन केंद्राचे अध्यक्ष श्री.भूपाल पटवर्धन प्रमुख अतिथी रूपाने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या शेवटी, डॉ. गौरी मोघे ताई, तन्मय भोळे सर व अमोघ भोळे सर ह्यांनी नाट्य आणि संस्कृत भाषेची कशी सांगड घालावी ह्याचे मार्गदर्शन दिले.
संस्कृत नाटके अजून प्रगत होण्याच्या दृष्टीने भविष्यात कार्यशाळा आयोजित करण्याचे सुद्धा संस्कृत विभागाचे प्रमुख श्री अंकित रावल यांनी जाहीर केले.
या स्पर्धेला साधारण 500 संस्कृतप्रेमी उपस्थित होते.
स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे –
सांघिक पारितोषिके –
डेक्कन महाविद्यालयाच्या ‘ मरुत्सखा ‘ ह्या एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकावले. पुणे विद्यापीठ यांच्या ‘श्रीभरतेश्वरबाहुबलिकथा’ नाट्याला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले तर अमेरिकन इन्स्टिट्युट च्या दोन विदेशी विद्यार्थी यांच्या ‘ सा सुमरमणी ‘ ह्या एकांकीकेला तृतीय पारितोषिक मिळाले आहे.
सांघिक उत्तेजनर्थ : स.प महाविद्यालय, नाट्य : अन्वीक्षा
तरुण वर्गातील लेखक, दिग्दर्शक, ध्वनी योजक, प्रकाश योजक, अभिनेता/अभिनेत्री ह्यांना प्रोत्साहन देण्यासाठी वैयक्तिक पारितोषिके घोषित केली गेली :
स्त्री अभिनय–
मल्लिका – Shuheng Zhang ,अमेरिकन इन्टिट्युट (प्रथम )
लक्ष्मीबाई तळपदे – आदिती सरदेसाई,डेक्कन काॕलेज ( द्वितीय )
प्रतिभा / युवती – श्रूती कार्लेकर,फर्ग्युसन महाविद्यालय ( तृतिय )
पुरुष अभिनय
लेले – तेजस साने,फर्ग्युसन महाविद्यालय ( प्रथम )
राजाभाऊ – गौरव चितळे,टिळक महाराष्ट्रात विद्यालय ( द्वितीय )
शिवरूर तळपदे – सौमित्र मांडके, डेक्कन महाविद्यालय ( तृतिय )
दिग्दर्शन
कल्याणी भोयर , डेक्कन महाविद्यालय ( प्रथम )
Shuheng Zhang , अमेरिकन इन्स्टिट्युट ( द्वितीय )
साज जोशी,शताक्षी पंडीत , स. प. महाविद्यालय ( तृतिय )
लेखन पारितोषिक
आराध्या गौरव,देवेश शहा – पुणे विद्यापिठ
विशेष पारितोषिक
संगीत : सहदेव जोशी , किर्तेश बाविस्कर , प्रथमेश बिवलकर (पुणे विद्यापीठ)
अमेरीकन इन्स्टिट्युट च्या कॅरोल रॉड्रिग्ज हिला विशेष लक्षवेधी अभिनय असे पारितोषिक मिळाले.