fbpx

पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे निधन

पुणे : भारतीय जनता पक्षाचे नेते आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे आज (बुधवार) निधन झाले. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी मागील काही दिवसांपासून दिनानाथ मंगेशकर हॉस्पीटलमध्ये  दाखल करण्यात आले होते. मात्र, आता मिळालेल्या माहितीनुसार खासदार गिरीश बापट यांचे निधन झाले आहे. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, सून असा परिवार आहे. ( Pune MP Girish Bapat passed away)

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते ते पुण्यातील भाजपचे किंगमेकर असा बापट यांचा राजकीय  प्रवास होता.  गेल्या अनेक दिवसांपासुन खासदार गिरीश बापट यांची प्रकृती बरी नव्हती. त्यांच्यावर वेळोवेळी रूग्णालयात आणि त्यानंतर घरी देखील उपचार सुरू होते. पुण्याच्या राजकारणात त्यांना भाऊ असे संबोधले जात होते.

गिरीश बापट यांची प्रकृती गेल्या अनेक महिन्यापासून ठीक नव्हती. त्यांना रूग्णालयात देखील दाखल करण्यात आले होते. प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर ते घरीच आराम करत होते. मात्र, ऑक्सिजनची श्वसन नलिका त्यांना लावलेली होती. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपने त्यांना प्रचारासाठी बोलावल्याने राजकारण बरेच तापले होते. 

खासदार गिरीश बापट यांचे पार्थिव आज दुपारी २ ते  सायंकाळी ६ वा. पर्यंत शनिवार पेठेतील निवासस्थानी अंतदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून ७ वाजता वैकुंठ स्मशान भूमी येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. 

गिरीश बापट अल्प परिचय

जन्म – 3 सप्टेंबर 1950
प्राथमिक शिक्षण – तळेगाव दाभाडे
माध्यमिक शिक्षण – न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग
महाविद्यालयीन शिक्षण (बी. कॉम.) – बीएमसीसी
1973 मध्ये टेल्कोमध्ये कामगार म्हणून रूजू
आणीबाणीत नाशिक जेलमध्ये 19 महिन्यांचा कारावास
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ आणि परिवारातील संस्थांची विविध पदांची जबाबदारी
1983 मध्ये पहिल्यांदा नगरसेवक
सलग तीनवेळा नगरसेवक
सत्ता नसतानाही महापालिकेत स्थायी समितीचे अध्यक्ष
1995 पासून सलग पाचवेळा कसब्याचे आमदार
देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्री
2019 मध्ये पुण्याचे खासदार

Leave a Reply

%d bloggers like this: