fbpx

प्रभाग १५ मधील, ‘कार्यकर्त्यांचा सत्कार’ व गणेश मंडळांच्या वतीने धंगेकरांचा सत्कार लवकरच..! गोपाळदादा तिवारी


पुणे – प्रभाग क्र १५ मधील ऊद्यान कार्यालयातील (वरचे नाट्यसभागृहातील) आमदार रविंद्र घंगेकराचा काल झालेला सत्कार, अत्यंत घाई गर्दीने तसेच, ‘मविआ घटक पक्षांतील काम केलेल्या अनेक ‘स्थानिक कार्यकर्त्यांना’ विश्वासात न घेता झाल्याचे निदर्शनास आले असुन, या सत्कारा मध्ये ‘स्थानिक कार्यकर्त्यांची मोठी अनुपस्थिती’ दिसल्यावर आपण या बाबत अनेकांना विचारणा केली.. तेंव्हा वरील परिस्थिती स्पष्ट झाल्याचे काँग्रेस प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे…!
या भागातुनच आपण निवडुन आलो असुन, पॅनेल’साठी व सिंगल वॅार्ड साठी ऊमेदवार ही दिलेत व काँग्रेस पक्षास तुल्यबळ मते ही धेतली.. तसेच या परीसरात काँग्रेस पक्ष व कार्यकर्त्यांचे अस्तित्व सदैव जपले आहे व त्याची परीणीती देखील या निवडणुकीत पहायला मिळाली..!
कसब्यातील निवडणुकीकडे देशाचे लक्ष होते…! मविआ घटक पक्षातील तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते ‘राष्ट्रीय कर्तव्य भावनेने व महाराष्ट्र घर्माचे पालन करीत’ जिद्गीने लढले, काम केले व या प्रभागात भाजपला प्रत्येक वेळी मिळणारे मताधिक्य कमी केले.. शिस्तबध्द प्रचार यंत्रणा राबवली.. जे अनेक कार्यकर्ते निस्वार्थी भावनेने झटले.. ते या सत्कारात बाजुला राहीले गेल्याची सल अनेकांच्या मनांत आहे..!
प्रभाग १५ मघील बैठका, प्रचार कार्यक्रम हे स्थानिक कार्यकर्त्यांनी घेतले.. याचे समक्ष साक्षीदार आमदार संग्रामदादा थोपटे आहेत. मात्र या प्रभागातुन जेंव्हा यश मिळाले, तेंव्हा मात्र श्रेयाचे खरे मानकरी असलेले कार्यकर्ते मागे राहू नयेत… तर “खरी फुले त्यांच्यावर पडावीत” याच भावनेने हा सत्कार लवकर आयोजित करण्यात येईल असे देखील गोपाळदादा तिवारी यांनी प्र १५ चे कार्यकर्त्यां मार्फत कळवले..!
वास्तविक, जेंव्हा ‘इतर प्रभागांचे मेळावे’ झाले तेंव्हा प्रभाग १५ चा मेळावा घेणे गरजेचे होते.. त्यावेळी मात्र काही मविआ पक्षातील सहकारीं कार्यकर्त्यां समवेत पुढाकार घेऊन, आम्ही प्रभाग १५ चा (स्थानिक-निमंत्रातांसाठीचा) मेळावा अखेर २० फेब्रु (६ दिवस अगोदर) रोजी यशस्वीरित्या घेतला व त्याचा मोठा अनुकुल परीणाम देखील साध्य झाला..!
अनेक जेष्ठ कार्यकर्ते या प्रभागातुन काम करण्यास बाहेर पडले होते खरे तर त्यांचा सन्मान होणे गरजेचे आहे.. त्यांचे विना असा सत्कार घाई गर्दीने उरकुन, श्रेय घेणे.. हे खरे व प्रामाणिक काम केलेल्या कार्यकर्त्यांना नाराज करणे व डावलण्या सारखे होउ नये, या करीतां लवकर सर्वांना विश्वासात घेऊन व निरीक्षक संग्रामदादा थोपटे यांचे ऊपस्थिती मघ्येच सत्कार आयोजित करण्यात येईल.. असे गोपाळदादा तिवारी यांनी कळवले..!
व्यवसाईक हेतुने काम करणारे काही नेते तसेच कार्यकर्तेही आहेत तसेच प्रामाणीक हेतुने व निस्वार्थ पक्षीय भावनेने काम करणारे कार्यकर्ते ही आहेत.. आत्ता जर या विषयी त्यांची भावना ओळखून न्याय्य भुमिका घेतली नाही, तर प्रामाणिक पणे वर्षानुवर्षे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खच्ची होईल.. म्हणुन त्यांचा सत्कार देखील आमदार संग्रामदादा थोपटे यांचे हस्ते लवकरच आयोजित करण्यात येईल त्याच बरोबर या भागातील अनेक गणेशोत्सव मंडळांनी देखील मा घंगेकरांच्या सत्काराची भावना व्यक्त केल्याने त्या सर्वांच्या सहभागाने संयुक्त सत्कार आयोजित करण्यात येईल असे ही गोपाळदादा तिवारी यांनी सांगितले..!

Leave a Reply

%d bloggers like this: