fbpx

भारतीय संस्कृती व संस्कारांचे प्रतीक श्रीराम – निरूपणकार सतीश घारपुरे

पुणे : वेदांत सांस्कृतिक मंच,कर्वेनगर या संस्थेतर्फे दिनांक २५ व २६ मार्च रोजी कर्वेनगर येथील वेदांत मंगलम लॉन्स येथे हिंदु नववर्षाचे स्वागत तसेच रामनवमी व हनुमान जयंती निमित्त सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाची सुरुवात भरतनाट्यम नृत्तिका श्रुती वेलणकर व गुरु मानसी वझे यांच्या नृत्याने झाली.श्रीराम कथेवर आधारित बहारदार नृत्याने त्यांनी सर्वांचीच मने जिंकली.त्यानंतर निरूपण कार सतीश घारपुरे यांनी हनुमान चालिसावर आधारित हनुमानाच्या कथेवर व रामायण वर अत्यंत ओघवत्या भाषेत प्रवचन केले.आपल्या प्रवचनामध्ये श्री.घारपुरे म्हणाले,”भारतीय संस्कृती व संस्काराचे प्रतीक श्रीराम आहे.पिढ्यानपिढ्या भारतीयांच्या मनातील गाभाऱ्यात रामायण अनभिषिक्तपणे विराजमान आहे.राम या शब्दात अथांग अर्थ भरलेला आहे,रामनामाने माणसाच्या आयुष्यात वृद्धिंगत करणारा सकारात्मक परिणाम होतो.ही एक विलक्षण व अद्भुत अनुभूती आहे.”
पसायदान होऊन पहिल्या दिवशीचा कार्यक्रम संपला. .
दुसऱ्या दिवशीची सुरुवात वात्सल्य पाळणाघरातील बालचमूंच्या हनुमान स्तोत्र पठणाने झाली. त्यानंतर निरुपनकार सतीश घारपुरे यांनी श्री हनुमान कथेचा उत्तरार्ध पूर्ण केला. “हनुमान, त्याची श्रीरामाप्रती असणारी सर्वस्व समर्पित भक्ती” संत श्री.तुलसीदास ह्यांच्या दृष्टीतून” असा विषय सतीश घारपुरे यांनी मांडला.कार्यक्रमाची सांगता सौ. माधुरीताई सहस्त्रबुद्धे, दिल्ली यांच्या Foundation for Holistic Development , पुणे विभाग यांच्यातर्फे ” राम तांडव स्तोत्र ” पठणाने झाली .यात २० महिलांनी भाग घेतला होता.
कार्यक्रमाला माजी आमदार मेधा कुलकर्णी , वृषाली चौधरी, लक्ष्मी दुधाणे, जयंत भावे, बापू मेंगडे,हेमंत बोरकर व कर्वेनगर परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: