शिवसेनेचे माजी शहरप्रमुख श्याम देशपांडे यांचा भाजपमध्ये प्रवेश
पुणे : शिवसेनेचे माजी नगरसेवक, माजी शहराध्यक्ष श्याम देशपांडे यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात आपल्या समर्थकांसाह जाहीर प्रवेश केला.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ आदी यावेळी उपस्थित होते. श्याम देशपांडे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत. पुणे महापालिकेत शिवसेनेनेकडून दोन वेळा नगरसेवक होते
त्यांच्या पत्नी संगीता देशपांडे दोन वेळा नगरसेविका होत्या. 2008 09 देशपांडे यांनी पुणे महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष पद भूषविले होते. 2012 ते 2014 या कालावधीत ते पुणे शहर शिवसेनेचे प्रमुख होते गेल्या वर्षी उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केल्यानंतर त्यांनी शिवसेना सोडली होती. त्यांनानंतर त्यांनी आज भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला त्यांच्यासोबत त्यांच्या विनोद गायकवाड, नारायण पाटील, समीर भट, अनिल हिंगमिरे, लक्ष्मण क्षिरसागर, नामा देडे,
महेंद्र आढाव, गोविंद चव्हाण, विजय कोलसे, तुषार गाढवे,अनिल मरळ सुरेश कुलकर्णी या कार्यकर्त्यांनीही भाजप मध्ये प्रवेश केला आहे.