fbpx

सलमानने माफी मागावी अन्यथा ….. लॉरेन्स बिश्नोईची जाहिर धमकी

मुंबई : बिश्नोई समाजात हरणाची पूजा करतात. मात्र सलमान खानने हरणाची हत्या केली. यामुळे आमच्या समाजाचा अपमान झाला आहे. जर सलमान खानने बीश्नोई समाजाची माफी मागितली तर आमच्या पासून त्याला काहीही धोका असणार नाही. मात्र, सलमान खानने असे केले नाही तर त्याला आमच्यापासून कोणीही वाचवू शकत नाही, अशी धमकी कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याने सलमान खानला दिली आहे. (Salman should apologize or else ….. Lawrence Bishnoi’s apparent threat)

एबीपी नेटवर्कला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याने थेट तुरुगातून ऑनलाईन मुलाखत दिली. यावेळी लॉरेन्स बिश्नोई याने बॉलीवूडचा भाईजान अभिनेता सलमान खान याला धमकी दिली आहे.

लॉरेन्स बिश्नोई म्हणाला, मी पाच वर्षांचा असताना सलमान खान ने आमच्या समाजाच्या परिसरात जावून हरणाची शिकार केली. वास्तविक आमचे गुरू हरणाला पाळायचे त्यामुळे बिश्नोई समाजात हरणाची पूजा करतो. मात्र सलमान खानने हरणाची हत्या केली. यामुळे आमच्या समाजाचा अपमान झाला आहे. जर सलमान खानने बीश्नोई समाजाची माफी मागितली तर आम्ही त्याला माफ करू.  नाही तर सलमान खानला आमच्यापासून कोणीही वाचवू शकत नाही.

पुढे तो म्हणाला, आमच्या समाजाच्या मंदिरात जाऊन सलमान खान ने आमच्या समाजाची माफी मागावी. असे केल्यास त्याला आमच्या पासून काहीही धोका नेसेल. प्रसिद्धीसाठी आम्ही सलमान खानला धमकी दिलेली नाही. आमच्या समाजात जीवहत्या निशिबद्ध आहे. मात्र सलमानच्या कृत्यामुळे आमचा समाज दुखावला गेला आहे. आमचा अपमान झाला. त्याने यापूर्वीच माफी मागितली असती तर त्याच्यावर केस झालीच नसती. मात्र, त्याने अद्याप माफी न मागीतल्याने त्यांच्यावर आमची नजर आहे.

 

Leave a Reply

%d bloggers like this: