सिद्धू मुसेवाला हत्येप्रकरणी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने केला मोठा खुलासा
मुंबई : पंजाबी गायक सिद्धू मूसवाला हत्याकांडप्रकरणी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने मोठा खुलासा केला आहे. सिद्धू मूसेवाला आमच्या विरोधी टोळीला पाठिंबा देत असे. त्यामुळे बदला घेण्याच्या उद्देशाने त्यांची हत्या करण्यात आली. मुसेवालाच्या हत्येची मला पूर्व कल्पना होती. मात्र, या हत्या प्रकरणात माझा थेट हात नव्हता. गोल्डी ब्रारने मुसेवालाचा खून केला. त्यानेच कॅनडा मधून फोनवर मुसेवालाच्या हत्येचा कट रचला होता, असा मोठा गोप्यस्फोट गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने केला आहे.
एबीपी नेटवर्कला थेट तुरूंगातून दिलेल्या ऑनलाईन मुलाखतीत लॉरेन्स बिश्नोईने हा खुलासा केला आहे. गायक मुसेवाला यांची 29 मे 2022 रोजी मानेसा येथे गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार यांच्यावर हत्येचा आरोप करण्यात आला आहे.
लॉरेन्स बिश्नोई म्हणाला, आमच्या विरोधी टोळीला तो मदत करत असे म्हणून त्यांच्याकडे लक्ष द्या असे मी म्हणालो होतो. मात्र, माझा या हत्या प्रकरणात थेट हात नव्हता. गोल्डी ब्रारने मुसेवालाचा खून केला. मुसेवालाचा खून झाला तेव्हा मी मी तुरुंगात होतो. जेव्हा त्याला जाग आली तेव्हा त्याला ठार झाल्याचे समजले.
यावेळी लॉरेन्स बिश्नोई याने हत्येसाठी वापरलेली शस्त्रे यूपीमधून आणल्याचे ही सांगितले.