रमणबाग प्रशालेत पाय दिवस सापशिडी आणि गणितज्ञांच्या पुस्तिकेच्या उद्घाटनाद्वारे उत्साहात साजरा
पुणे : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेत मंगळवार दि.14 मार्च 2023 रोजी ‘पाय दिवस’साजरा करण्यात आला . प्रमुख अतिथी रवींद्र आचार्य यांच्या हस्ते सापशिडीचे उद्घाटन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
संगीत विभागाच्या विद्यार्थ्यांनी संगीत शिक्षक हर्षद गाडगीळ यांच्या मार्गदर्शनानुसार राधिका देशपांडे यांनी लिहिलेल्या ‘करू गुणांची बेरीज वजा करूअवगुण’ हे गणित गीत सादर केले.रवींद्र आचार्य यांनी गोष्टीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना निरीक्षण क्षमता,तार्किकता कशी वाढवावी याबद्दल मार्गदर्शन केले.इयत्ता सातवी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय ऑनलाइन आणि ऑफलाइन गणित प्रश्नमंजुषा आयोजित करण्यात आली होती.त्यामधील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले.गणितज्ञांच्या माहितीपर पुस्तिकेचे उद्घाटन करण्यात आले.या कार्यक्रमाचे संचालन श्रीयश राशिनकर , यश शेलार ,अथर्व काटे , राधेय डिंगरे , साईराज ढमढेरे , लौकिक सुर्वे या विद्यार्थ्यांनी केले . पर्यवेक्षक दिलीप रावडे यांच्या मार्गदर्शनानुसार गणित विभाग प्रमुख अनघा काकतकर व योगेश पडदुणे यांनी काम पाहिले. सर्व गणित शिक्षकांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी झाला. कार्यक्रमास सर्व शिक्षक,शिक्षकेतर व विद्यार्थी उपस्थित होते.