पीवायसी एचडीएफसी बँक रॅकेट लीग 2023 स्पर्धेत मस्कीटर्स संघाला विजेतेपद
पुणे – पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या तर्फे आयोजित पीवायसी एचडीएफसी बँक रॅकेट लीग स्पर्धेत अंतिम फेरीत मस्कीटर्स संघाने तलवार्स संघाचा 13-10 असा पराभव करून विजेतेपद संपादन केले
पीवायसी हिंदू जिमखानाच्या टेबलटेनिस, टेनिस व बॅडमिंटन कोर्टवर पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत बॅडमिंटन प्रकारात मस्कीटर्स संघाने तलवा र्स संघाला 4-4 असे बरोबरीत रोखले. मस्कीटर्स संघाकडून प्रथम वाणी, आदिती रोडे, चिन्मय जोशी, आशुतोष सोमण, ईशान भाले, निलेश केळकर, आनंद घाटे, सिद्धार्थ खिवंसरा यांनी विजयी कामगिरी केली. टेबल टेनिसमध्ये मात्र मस्कीटर्स संघाला तलवार् स संघाने3-5 असा पराभव करून आघाडी मिळवली. तलवार्स संघाकडून मिहीर ठोंबरे, सिद्धार्थ निवसरकर, रणजीत पांडे, देवेंद्र चितळे, अतुल ठोंबरे, कुणाल भुरट, रियान माळी, अतुल किल्लेदार, कर्ना मेहता, विनायक भिडे यांनी सुरेख कामगिरी केली.
टेनिस प्रकारात अमित नाटेकर, पराग चोपडा, सिद्धार्थ मराठे, अर्णव काळे, अमित पाटणकर, जयदीप वाकणकर, सन्मय तेलंग, तुषार नगरकर, रिया वाशीमकर, प्रियदर्शन डुंबरे, भाग्यश्री देशपांडे, ईशा न भाले यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर मस्कीटर्स संघाने तलवार्स संघाचा 6-1 असा पराभव करून विजय मिळवला. स्पर्धेतील विजेत्या संघाला करंडक व पदके अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण पीवायसी हिंदु जिमखानाचे अध्यक्ष कुमार ताम्हाणे, मानद सचिव सारंग लागु, एचडीएफसी बँकेच्या भांडारकर शाखेच्या मुख्य वैशाली बेलमकर, एचडीएफसी बँकेचे रिलेशनशीप मॅनेजर मनोज पहुजा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी क्लबच्या बॅडमिंटन विभागाचे सचिव तन्मय आगाशे, टेनिस विभागाचे सचिव अभिषेक ताम्हाणे, तुषार नगरकर, शिरीष साठे, रणजीत पांडे, देवेंद्र चितळे, केदार नाडगोंडे, नंदन डोंगरे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम फेरी:
मस्कीटर्स वि.वि.तलवार्स 13-10
बॅडमिंटन: मस्कीटर्स बरोबरी वि.तलवार्स 4-4(प्रथम वाणी/आदिती रोडे वि.वि.तन्मय चोभे/तेजस किंजवडेकर 30-23; तुषार नगरकर/पराग चोपडा पराभुत वि.सिद्धार्थ निवसरकर/देवेंद्र चितळे 23-30; यश काळे/गौतम मलकर्णेकर पराभुत वि. दिप्ती सरदेसाई/प्रशांत वैद्य 20-30; चिन्मय जोशी/आशुतोष सोमण वि.वि.बाळ कुलकर्णी/शिरीष साठे 30-16; विश्वास मोकाशी/अमित नाटेकर पराभुत वि.कर्ना मेहता/सचिन जोशी 10-30; ईशान भाले/निलेश केळकर वि.वि.कपिल बाफना/सुदर्शन बिहानी 30-29; भाग्यश्री देशपांडे/समित आजगावकर पराभुत वि.मनिष शहा/विनीत राठी 11-30; आनंद घाटे/सिद्धार्थ खिवंसरा वि.वि.स्वरूप कुलकर्णी/अतुल ठोंबरे 30-20);
टेबल टेनिस: मस्कीटर्स पराभुत वि. तलवार्स 3-5(पराग चोपडा/शिल्पा पांडे पराभुत वि.मिहीर ठोंबरे/सिद्धार्थ निवसरकर 11-30; संजय बामणे/जयदीप वाकणकर पराभुत वि.रणजीत पांडे/देवेंद्र चितळे 29-30; तुषार नगरकर/सिद्धार्थ मराठे वि.वि.तेजस किंजवडेकर/तन्मय चोभे 30-18; अमित नाटेकर/आनंद घाटे पराभुत वि.अतुल ठोंबरे/कुणाल भुरट 11-30; गौतम मलकर्णेकर/अमित पाटणकर पराभुत वि.रियान माळी/अतुल किल्लेदार 26-30; संजय शहा/ईशान भाले पराभुत वि.कर्ना मेहता/विनायक भिडे 29-30; प्रियदर्शन डुंबरे/प्रथम वाणी वि.वि.निशांत भणगे/मिहीर दिवेकर 30-18; अनिल आगाशे/आशुतोष सोमण वि.वि.सचिन जोशी/सुदर्शन बिहानी 30-18);
टेनिस: मस्कीटर्स वि.वि. तलवार्स 6-1(अमित नाटेकर/पराग चोपडा वि.वि.निशांत भणगे/तेजस किंजवडेकर 30-13; सिद्धार्थ मराठे/अर्णव काळे वि.वि.मिहीर दिवेकर/तन्मय चोभे 30-23; अमित पाटणकर/जयदीप वाकणकर वि.वि.शिव जावडेकर/आनंद परचुरे 30-13; सन्मय तेलंग/तुषा र नगरकर वि.वि.रियान माळी/देवेंद् र चितळे 30-15; रिया वाशीमकर/प्रियदर्शन डुंबरे वि.वि.शिरीष साठे/चारुदत्त साठे 30-12; आश्विन हळदणकर/भाग्यश्री देशपांडे पराभुत वि.सोहिल गाला/सिद्धार्थ नि वसरकर 15-20; भाग्यश्री देशपांडे/ईशान भाले वि.वि.कर्णा मेहता 20-00).
इतर पारितोषिके:
मोस्ट व्हॅल्युएबल महिला खेळाडू: भाग्यश्री देशपांडे;
मोस्ट व्हॅल्युएबल वरिष्ठ खेळाडू: आनंद घाटे;
बॅडमिंटन प्लेअर ऑफ द टूर्नामेंट: प्रथम वाणी;
टेनिस प्लेअर ऑफ द टूर्नामेंट: सिद्धार्थ मराठे;
टेबल टेनिस प्लेअर ऑफ द टूर्नामेंट: संजय बामणे;
प्लेअर ऑफ द टूर्नामेंट: तन्मय चोभे.