fbpx

पुण्यात मुलींनी दाखवला दस का दम


पुणे : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त पुण्यात भारतीय क्रीडा प्राधिकरणाद्वारे प्रायोजित व नॅशनल योगासन स्पोर्टस् फेडरेशन द्वारा आयोजित खेलो इंडिया दस का दम योगासन स्पर्धेत महाराष्ट्र व गोव्याच्या महिला योगासन पटूंनी एकाचढ एक योगासने करुन स्पर्धा गाजवली.
१९ जिल्ह्यातून आलेल्या १६१ योगासन पटूंसाठी सूस येथील ध्रुव ग्लोबल स्कूल मधे पारंपरिक व कलात्मक अशा दोन क्रीडा प्रकारात या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. सुनंदा राठी यांनी स्पर्धा व्यवस्थापक, स्नेहल पेंडसे यांनी तांत्रिक संचालक व शुभदा भाटे यांनी स्पर्धा समन्वयक म्हणून काम पाहिले.
या समारंभाची सुरूवात दिपनृत्याद्रवारे दिप प्रज्वलन अशा अनोख्या पध्दतीने करण्यात आली.. ध्रुव ग्लोबल च्या प्रिसिंपॉल संगीता राऊत यांनी सर्व सहभागींना शुभेच्छा दिल्या व यशस्वी स्पर्धा आयोजनासाठी सर्वाचे आभार मानले.
स्पधेच्या व्यवस्थापिका डॉ. सुनंदा राठी यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले. तसेच सर्व सहभागी तांत्रिक वर्ग, प्रशिक्षक, ध्रुव ग्लोबल ॲकडमीचा सहकारी वर्ग त्यांचे आभार मानले. ‘महिला दिनाचा औचित्य साधून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विविध राज्यातून आलेल्या महिलांनी हिरिरीने भाग घेऊन नयनरम्य योगप्रात्यिक्षके सादर केली हे नक्कीच कौतुकास्पद आहे परंतु अशा स्पर्धा तेवढ्यापुरत्याच मर्यादित न राहाव्यात व योग साधनेचा उपयोग आपल्या उत्तम शारिरीक क मानसिक स्वास्थ्यासाठी आपल्या दैनंदिन जीवनात नित्य नियमित करावा ‘ असे आवाहन त्यांनी केले
१८ वर्षाखालील वयोगटात पारंपरिक प्रकारात सेजल सुतार (कोल्हापुर) हिने प्रथम, अमृता गुंफेकर (सोलापुर) हिने द्वितीय, ईशा नागाकर (पुणे) हिने तृतीत क्रमांक प्राप्त केले. १८ वर्षावरील वयोगटात सानिका केळकर (पुणे) प्रथम, गायत्री वारे (पुणे) द्वितीय, प्रज्ञा गायकवाड (कोल्हापुर) यांनी अनुक्रमे पहिली तीन पारितोषिके पटकावली. कलात्मक योगासन क्रीडा प्रकारात १८ वर्षांखालील वयोगटात आर्या सपटे (मुंबई उपनगर) हिने प्रथम व रश्मी नावेलकर आणि याशिका देवली (दोन्ही पनजी) यांनी द्वितीय क्रमांकाचा करंडक पटकावला. १८ वर्षावरील वयोगटात सानिका जाधव (कोल्हापूर), खुशी तिवारी (ठाणे), धनश्री पाटील (पुणे) यांनी पहिली तीन पारितोषिके प्राप्त केली.
पारितोषिक वितरण समारंभ डॉ. प्रणती टिळक व यशोवर्धन मालपाणी, बापू पाडळकर यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे विश्वस्त डॉ. प्रणती टिळक ह्यांनी मानसिक व शारीरिक स्वास्थ्यासाठी योगअभ्यास किती गरजेचा आहे हे लोकमान्य बाल ग॔गाधर टिळकांनी स्वातंत्र्य पूर्व काळात आपल्या दिनचर्येने समाजाला पटवून दिले होते ही आठवण सांगितली.
ध्रुव ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी या वेळी योगासनांची सुंदर प्रात्यक्षिके सादर केली. साईच्या वतीने अमरजित निंबाळकर स्पर्धा निरिक्षक म्हणून उपस्थित होते. यावेळी आर्मी रेसिलिंग कोच श्री हणमंतराव गायकवाड उपस्थित होते.
स्पर्धा संचालिका स्नेहल पेंडसे यांनी स्पर्धेबाबतची माहिती दिली तर स्पर्धा संयोजिका शुभदा आपटे यांनी स्पर्धा नियम समजावून सांगितले.  जगदिश दिवेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Reply

%d bloggers like this: