fbpx

छत्रपती संभाजी महाराजांना रक्तदानातून मानवंदना

पुणे : शिवजयंती महोत्सव समिती, पुणे तर्फे स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३४ व्या बलिदान दिनी रक्तदानातून मानवंदना देण्यात आली. मानवंदनेचे हे सलग १० वे वर्ष आहे. यावेळी जिजाऊ माँसाहेब शहाजी महाराज शिवज्योत रथाच्या नेतृत्वाखाली शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळ्यात सहभागी होणाऱ्या तब्बल १०० स्वराज्यघराण्यांच्या वंशजांनी, ढोलताशा पथकांनी, क्रिडा संघटनांनी, गणेशोत्सव मंडळांनी रक्तदान मानवंदनेत सहभाग नोंदवला.

म्हात्रे पुलाजवळील शुभारंभ लॉन्स येथे झालेल्या शिबीरात मानवंदनेची सरुवात छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून झाली. यावेळी रक्तदान मानवंदनेचे संकल्पक समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड, सचिन पायगुडे, रवींद्र कंक, शंकर कडू, मंगेश शिळीमकर, प्रदीप मरळ, प्रवीणभय्या गायकवाड,कृणाल मालुसरे तसेच स्वराज्यघराण्यांचे प्रतिनीधी उपस्थित होते.

रक्तदान मानवंदनेची सुरुवात ईशान अमित गायकवाड, किरण कंक, राजेश जोगदंड, सचिन पायगुडे तुषार जगताप, तन्वी दळवी, निलेश जेधे, मोहन पासलकर, किरण शितोळे, मयुरेश दळवी, दिग्वीजय जाधवराव, तुषार पायगुडे रक्तदान करुन केली.यावेळी रक्तदात्यांचा संकल्प पुर्ण झाला. पुणे ब्लड रक्तपेढीने रक्त संकलन केले.

अमित गायकवाड म्हणाले स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिन ११ मार्च हा दिवस “मृत्युंजय रक्तदान दिन” म्हणुन महाराष्ट्र सरकारने जाहिर करावा. त्यादिवशी संपूर्ण महाराष्ट्राभर रक्तदान चळवळीतून संभाजी महाराजांना मानवंदना द्यावी. ज्या स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांनी रक्ताचा थेंबनथेंब अर्पण केला, स्वराज्याचे रक्षण करण्यासाठी, भारतभूमीचे रक्षण करण्यासाठी, भारताच्या गौरवशाली संस्कृतीच रक्षण करण्यासाठी. त्या स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांना रक्तदानातून मानवंदना देऊयात, रक्ताच पांग रक्तान फेडूयात रक्ताच रक्ताशी नात जोडूयात हि जाणीव जपत आम्ही सलग १० वर्षे रक्तदान मानवंदना आयोजित करीत आहोत आणि भविष्यात राज्यव्यापी मानवंदनचे आयोजन करण्यात येणार आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: