fbpx

शीतल म्हात्रे व्हायरल व्हीडीओ प्रकरणी साईनाथ दुर्गे यांना अटक

मुंबई : शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे आणि प्रवक्ता शीतल म्हात्रे यांचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्या प्रकरणी युवासेनेचे साईनाथ दुर्गे आणि मातोश्री फेसबुक पेज चालवणारे विनायक डावरे यांच्यासह इतर तिघांना अटक केली आहे. आतापर्यंत या प्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना १५ मार्चपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. या पाच आरोपींपैकी चार जण ठाकरे गटाचे तर एक जण काँग्रेसचा कार्यकर्ता असल्याची माहिती आहे.

व्हायरल होणारा व्हीडीओ हा मॉर्फ करण्यात आल्याची तक्रार शीतल म्हात्रे यांनी केली असून दहिसर पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. आमदार प्रकाश सुर्वे आणि शीतल म्हात्रे यांचा व्हीडिओ मार्फ करणाऱ्या मुख्य आरोपीच्या शोध घेण्यासाठी दहिसर पोलिसांनी फेसबुक कंपनीला देखील पत्र पाठवले आहे.

शितल म्हत्रे यांनी काल पत्रकार परिषद घेऊन ठाकरे गटावर आरोप केले होते. त्यांचा व्हीडीओ मॉर्फ करून मातोश्री या पेजवरून व्हायरल केला गेला होता. मातोश्री पेजवर अपलोड करणारा आरोपीला देखील दहिसर पोलिसांनी अटक केली आहे.

विनायक डायरे या २७ वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली असून रवींद्र चौधरी यांनी विनायक डावरेला व्हीडीओ व्हायरल करायला दिला असल्याची माहिती आहे. विनायक डावरे मातोश्री पेज ऑपरेट करत होता. शीतल म्हात्रे यांचा व्हीडीओ व्हायरल करण्याच्या प्रकरणात ठाकरे गटाच्या युवासेनेचे कोअर कमिटीचे सदस्य साईनाथ दुर्गे यांनाही पोलिसांच्या ताब्यात घेतले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: