ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात भराताचा डंका; दोन पुरस्कारांवर भारताची मोहोर
लॉस एंजेलिस येथे आयोजित यंदाच्या ९५ व्या अकादमी पुरस्कार सोहळ्यात भारताने यंदा एक नाही तर, दोन पुरस्कारांवर नाव कोरत आपला झेंडा रोवला आहे. यामुळे भारतीय सिने सृष्टहीत आनंदाचे वातावरण आहे. यामध्ये एसएस राजामौली यांच्या ‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याने ओरिजिनल साँग (सर्वोत्कृष्ट मूळ गाणं) विभागात ऑस्कर पुरस्कार पटकावला आहे. तर ‘द एलीफेंट विस्पर्स’ (The Elephant Whisperers) या लघुपटाला ‘बेस्ट डॉक्युमेंट्री’चा पुरस्कार मिळाला आहे.
एसएस राजामौली यांच्या ‘आरआरआर’ सिनेमातील ‘नाटू नाटू’ गाण्याने संपूर्ण जगात वेड लावले आहे. या ऑस्कर पुरस्कारामुळे ओरिजिनल साँग (सर्वोत्कृष्ट मूळ गाणं) या विभागात ऑस्कर पुरस्कार पटकावणारा हा पहिला भारतीय चित्रपट ठरला आहे. ‘नाटू नाटू’ गाण्याचे गीतकार एम.एम किरवाणी (M M Keeravani) आणि गीतकार चंद्रबोस यांनी स्टेजवर जाऊन हा ऑस्कर पुरस्कार स्वीकारला. यावेळी एम.एम किरवाणी यांनी खास अंदाजात भाषण केले. दरम्यान जेव्हा ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात ‘नाटू नाटू..’ गाणे मंचावर सादर करण्यात आलं तेव्हा त्याला स्टँडिंग ओव्हेशन मिळालं.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्कर विजेत्यांना ट्वीट करून शुभेच्छा दिल्या आहेत.